Radhakrishna Vikhe Patil शरद पवारांनी आम्हाला ज्ञान शिकवू नये, राधाकृष्ण विखे पाटील यांचा टोला

Radhakrishna Vikhe Patil शरद पवारांनी आम्हाला ज्ञान शिकवू नये, राधाकृष्ण विखे पाटील यांचा टोला

Radhakrishna Vikhe Patil

विशेष प्रतिनिधी

मुंबई: ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देता येईल का, हे शरद पवार आणि महाविकास आघाडीने सांगावे. त्यांनी आपली भूमिका जाहीर करावी. पण त्यावर ते काही बोलत नाहीत. घटना दुरुस्ती केली पाहिजे, असे ज्ञान त्यांनी आम्हाला देऊ नये, असा टोला भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांना लगावला आहे. Radhakrishna Vikhe Patil

तमिळनाडूच्या आरक्षणाचा संदर्भ देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आरक्षणासाठी घटना दुरुस्तीचा प्रस्ताव मांडला आहे. शरद पवारांच्या विधानावर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, मला शरद पवारांचे नेहमीच आश्चर्य वाटते. ते राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री होते. 1994 साली मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना मराठा समाजाचा आंतरभाव करावा, हे त्यांच्या का लक्षात आले नाही? दहा वर्ष केंद्रात मंत्री होते. त्यावेळी केंद्रात आणि राज्यात युपीएचे सरकार होते. घटनेत बदल करून आरक्षण देऊ शकतो, हे त्यांना दहा वर्षांत लक्षात आले नाही का? मराठा समाजाची आरक्षणाची मागणी आजची नाही, जुनी आहे. स्वत:कडे जबाबदारी असताना ती पूर्ण केली नाही. आज ते आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत, हे दुर्दैवी आहे. त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर सरकार गांभीर्याने विचार करत आहे, असे भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. हैदराबाद आणि सातारा गॅझेटिअरची तातडीने अंमलबजावणी करण्याची जरांगे यांची मागणी असून, त्यातील कायदेशीर त्रुटी तपासण्याचे काम सुरू आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली, अशी माहिती विखे पाटील यांनी दिली.



विखे पाटील यांच्या माहितीनुसार, सरकारने गोळा केलेल्या पुराव्यांमध्ये आपल्याला जे काही सॅम्पल आपल्याल मिळालेत, ती संख्या मिळाली आहे. त्यात नावे नाहीत. यावर कायदेशीर मार्गदर्शन घेण्यासाठी सायंकाळी ५ वाजता राज्याच्या अॅडव्होकेट जनरल यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीनंतरच मनोज जरांगे यांच्यासमोर अंतिम प्रस्ताव मांडला जाईल, असे त्यांनी सांगितले.

सध्याच्या टप्प्यात मनोज जरांगे यांना भेटण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे त्यांनी सांगितले. समितीच्या सदस्यांचा आज मनोज जरांगेची भेट घेण्याचा प्रश्न नाही. कारण त्यांनी मुद्दे उपस्थित केलेत. मी जी मागणी केली, त्यासंदर्भात तुम्ही काय निर्णय घेतला याबद्दल ते विचारणा करतील. त्यामुळे आता समितीचे सदस्य, अॅडव्होकेट जनरल यांच्याशी संपूर्ण चर्चा करून अंतिम प्रस्ताव मनोज जरांगेंसमोर मांडण्यात येईल, असे विखे पाटील म्हणालेत.

माझी मुंबईकरांना विनंती आहे, मराठा समाजाच्या आंदोलनाला सहकार्य केले पाहिजे. मुंबईकरांना त्रास होतो ही गोष्ट सर्वश्रुत आहे. पण तो त्रास जाणीवपूर्वक नाहीये. विशिष्ट मागण्यांसाठी आंदोलन होत आहे. मराठा आंदोलक सुद्धा जनतेला कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही, यासंदर्भात दक्षता घेईल, असे मला वाटते. मनोज जरांगे यांनी देखील आंदोलकांना कुठलाही अनुचित प्रकार न करण्याचे आवाहन केले आहे. आंदोलकांनीही जरांगेंच्या आव्हानाला प्रतिसाद देत शिस्तबद्ध आंदोलन सुरू ठेवलेले आहे, असेही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

Sharad Pawar should not teach us knowledge, says Radhakrishna Vikhe Patil

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023