विशेष प्रतिनिधी
लाेणावळा : Ajit Pawar लाेकसभा निवडणुकीच्या काळात मावळचे आमदार सुनील शेळके यांनी थेट शरद पवारांवर टीका केली हाेती. त्यामुळे शरद पवार गटाने त्यांच्यावर कठाेर टीका केली हाेती. मात्र, आता लाेणावळा नगर परिषदेत भाजपला राेखण्यासाठी शेळके यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाला साथ देण्याचा निर्णय शरद पवार गटाने घेतला आहे.Ajit Pawar
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये अजित पवार गट आणि शरदचंद्र पवार गटात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. शरद पवार गटाने लोणावळ्यात अजित पवार गटाला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या अनपेक्षित हालचालीमुळे लोणावळ्यातील राजकीय संतुलन पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, प्रभाग क्रमांक 13 ३ मध्ये दोन्ही गटांनी मैत्रीपूर्ण लढत ठेवण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.Ajit Pawar
लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे एकत्र येणे म्हणजे भाजपला मोठं आव्हान देण्याचा प्रयत्न असल्याचं स्पष्ट दिसत आहे. मागील काही दिवसांत येथे भाजप आणि राष्ट्रवादी गटांमध्ये तणाव जाणवत होता. दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकाच रणनीतीखाली काम करत भाजप विरोधात संयुक्त मोहीम राबवण्याची तयारी केली आहे.या मैत्रीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडणुकीत भक्कम आधार मिळणार आहे.
दोन्ही गट एकत्र आल्याचे स्वागत करताना आमदार सुनील शेळके यांनी सांगितले की, शरद पवार गटाने दाखवलेल्या पाठिंब्याची परतफेड योग्य सन्मानाने केली जाईल. येत्या काळात नगरपालिका, वडगाव नगरपंचायत किंवा इतर शासकीय समित्या असोत, शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांना योग्य प्रतिनिधित्व आणि मान दिला जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शरद पवार गटाने दाखवलेली सकारात्मकता केवळ निवडणुकीपूरती नसून भविष्यातील सहकार्यासाठी महत्त्वाची आहे. शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवणारा मोठा वर्ग या निर्णयामुळे पुन्हा राष्ट्रवादीकडे एकत्र येईल आणि आगामी प्रचार मोहीमेत मोठे योगदान देईल.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नासीर शेख यांनी सांगितले की, गेल्या चार ते पाच दिवसांपासून या मुद्द्यावर चर्चा सुरू होती. अजित पवार गटाने अधिकृत पत्र पाठवून पाठिंब्याची विनंती केली होती. त्यानंतर स्थानिक स्तरावर झालेल्या विचारमंथनानुसार हा निर्णय घेण्यात आला. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या मतांना प्राधान्य देत हा निर्णय मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. शेख म्हणाले की, ही साथ केवळ निवडणुकीसाठी नाही, तर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एकत्र येऊन भविष्यकाळात स्थिर राजकीय नेतृत्व उभारण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.
लोणावळ्यातील या नव्या राजकीय समीकरणामुळे नगरपरिषद निवडणूक आता सरळ दोन गटांमध्ये विभागली गेली आहे. एकीकडे संयुक्त राष्ट्रवादी आणि दुसरीकडे भाजप. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्यामुळे स्थानिक मतदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे. या मैत्रीमुळे राष्ट्रवादीला अधिक बळ मिळणार असून भाजपला थेट समोरून मोठं आव्हान स्वीकारावं लागणार आहे, हे निर्विवाद आहे. आगामी काळात प्रचार मोहीम अधिक रंगतदार होणार असून या एकत्रित लढतीचा लोणावळ्यातील राजकीय चित्रावर मोठा परिणाम होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे. त्यामुळे लोणावळा नगरपरिषद निवडणूक ही फक्त स्थानिक निवडणूक न राहता दोन गटांच्या एकतेचा आणि राजकीय सामर्थ्याचा महत्वाचा टप्पा बनली आहे.
Sharad Pawar supports Ajit Pawar to contest against BJP in Lonavala
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांचा मनाचा मोठेपणा, उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या सार्वजनिक न्यास अध्यक्षपदी नियुक्ती
- Uddhav Thackeray : ज्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या होत्या त्यांचे सरकार आले, उद्धव ठाकरे म्हणाले बिहारचे गणित अनाकलनीय
- Praful Patel : पैशाच्या आधारावर कोणी निवडून येत नाही, प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले निवडणुकीतील पैशाचे गणित
- Tejashwi Yadav : दारुण पराभवानंतर राष्ट्रीय जनता दलात अंतर्गत बंड, लालू कुटुंबात संघर्ष, तेजस्वी यादवांनी बहीण रोहिणी आचार्याला घराबाहेर काढले



















