विशेष प्रतिनिधी
Sharad Pawar राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आमदार सदाभाऊ खोत यांनी केलेल्या अशोभनीय टीकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. प्रकारची वक्तव्ये आम्ही कदापीही खपवून घेणार नाही, असा इशारा वळसे पाटील यांनी दिला आहे. Ajit Pawar, Dilip Walse Patil Furious Over Criticism of Sharad Pawar; Issue Stern Warning to Sadabhau Khot
सांगली जिल्ह्यातील जतमध्ये गोपीचंद पडळकर यांच्यासाठी महायुतीची सभा पार पडली. या सभेत सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्या शारीरिक व्यंगावरुन टीका केली. यावर वळसे पाटील यांनी म्हटले आहे कीज्येष्ठ नेते आमचे सर्वांचे आधारस्तंभ आदरणीय शरद पवार साहेबांविषयी सदाभाऊ खोत यांनी अतिशय खालच्या थराला जाऊन घृणास्पद वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमी असून, अतिशय संतापजनक वक्तव्य आहे. या संपूर्ण प्रकारचा मी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो आणि अशा प्रकारची वक्तव्ये आम्ही कदापीही खपवून घेणार नाही. तसेच या प्रकारची वक्तव्ये सर्वांनी टाळावीत व एक तारतम्य आणि भान बाळगून प्रचार करावा.
खोत सभेत बोलताना म्हणाले होते की, पवारसाहेबांना मानावं लागेल, कारण ते म्हणतायत की मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय. कसला? तुला तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का? देवेंद्र फडणवीस यांना का घेरायला लागलेत माहिती आहे का? आपल्या घरात गाय असते तशी राज्याची तिजोरी आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे लोक घेरतायत, कारण देवेंद्र फडणवीस म्हणत होते गायीचं सगळं दूध वासरांचं आहे, मी सगळं दूध वासरांना देणार.
पवार साहेबांना नववा महिना लागला आणि कळा सुटल्या, ते म्हटले माझ्या चिल्यापिल्यांचं कसं व्हायचं… पवारसाहेब तुमच्या चिल्यापिल्यांनी कारखाने हाणले, सुतगिरण्या हाणल्या, बँका हाणल्या… पण तरी पवारसाहेबांना मानावं लागेल, कारण ते म्हणतायत की मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय. कसला? तुला तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का?’ असं वादग्रस्त विधान सदाभाऊ खोत यांनी यावेळी केलं. ज्यावरून आता वादाला तोंड फुटलं आहे.