विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची कंबर कसली आहे. त्यातच राज्य निवडणूक आयोगाने पक्षांच्या मागणीला प्रतिसाद देत प्रमुख प्रचारकांच्या मर्यादेतील संख्या 20 वरून 40 करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यास सुरुवात केली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ने 40 प्रमुख नेत्यांची यादी घोषित केली आहे.
‘महाराष्ट्र राज्य राजकीय पक्ष नोंदणी, विनियमन आणि निवडणूक चिन्ह (आरक्षण व वाटप) आदेश, 2025’ मधील परिच्छेद 26 नुसार, प्रत्येक राजकीय पक्षाला प्रमुख प्रचारकांची यादी सादर करावी लागते. या पार्श्वभूमीवर आता आयोगाने प्रचारकांची संख्या वाढवण्यास मान्यता दिली आहे.
राजकीय पक्षांनी ही यादी संबंधित जिल्हाधिकारी किंवा महानगरपालिका आयुक्तांकडे सादर करावी लागणार आहे. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये प्रचाराचा वेग आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी
उद्धव बाळासाहेब ठाकरे
आदित्य ठाकरे
सुभाष देसाई
संजय राऊत
अनंत गीते
चंद्रकांत खैरे
अरविंद सावंत
भास्कर जाधव
अनिल देसाई
विनायक राऊत
अनिल परब
राजन विचारे
सुनील प्रभू
आदेश बांदेकर
वरुण सरदेसाई
अंबादास दानवे
रवींद्र मिर्लेकर
विशाखा राऊत
नितीन बनूगडे पाटील
राजकुमार बाफना
प्रियांका चतुर्वेदी
सचिन अहिर
मनोज जामसुतकर
सुषमा अंधारे
संजय (बंडू) जाधव
किशोरी पेडणेकर
ज्योती ठाकरे
शीतल शेठ-देवरूखकर
जान्हवी सावंत
शरद कोळी
ओमराजे निंबाळकर
सुनील शिंदे
वैभव नाईक
नितीन देशमुख
आनंद दुबे
किरण माने
अशोक तिवारी
प्रियांका जोशी
सचिन साठे
लक्ष्मण वाडले
या यादीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अनुभवी मंत्री, खासदार, आमदार आणि लोकप्रिय चेहरे यांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे पक्षांना आता प्रचार मोहिमेत अधिक ताकदीनं उतरता येणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, प्रचारकांची संख्या वाढल्याने ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत पक्षाचा संदेश पोहोचविणे अधिक सुलभ होणार आहे, आणि येत्या काही दिवसांत इतर पक्षांचीही स्टार प्रचारकांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
Shiv Sena Thackeray Releases List of 40 Star Campaigners for Upcoming Elections
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…



















