विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सोलापूर येथे आग लागून झालेल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत जाहीर केली आहे. Solapur fire
पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे की “महाराष्ट्रातील सोलापूर येथे आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झाले. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती सहवेदना. जखमी व्यक्ती लवकर बऱ्या व्हाव्यात अशी प्रार्थना.प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये दिले जातील. Solapur fire
सोलापूर येथील अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीच्या टॉवेल कारखान्यात लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. सोलापुरातील एका टॉवेल कारखान्याला रविवारी पहाटे साडेचार च्या सुमारास आग लागली. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कारखान्याच्या कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळून आले.
भडकलेली आग व धूर यामुळे मृतदेहांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली. शेवटी भिंत फोडून मृतदेह बाहेर काढले व शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. बारा तासानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमक दलास यश आले.
Solapur fire victims get help from Prime Minister’s National Relief Fund
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर