विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर : महायुतीमध्ये फोडाफोडी करायची नाही मित्रपक्षांच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दुसऱ्या पक्षात घ्यायचे नाही हे ठरलेले असताना काही लोकांना छत्रपती संभाजीनगरमध्ये काही लोकांना पैशाची मस्ती आली आहे त्यांच्या जोरावर त्यांनी फोडाफोडी केली आहे. आम्ही याची गांभीर्याने दखल घेतली असून याचा अहवाल आम्ही एकनाथ शिंदे यांना देणार आहोत. महायुतीच्या अंतर्गत जर हे सुरू राहिले तर त्यांचा परिणाम सर्वांनाच भोगावा लागेल अशा इशारा समाज कल्याण मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी दिला.
लोकं ऑप्शन शोधत असतात याचा अर्थ प्रवेश देणं होते नाही हे चंद्रशेखर बावनकुळे यांना काय ठरलंय हे त्यांनाही माहिती आहे. आम्ही तुमच्याकडून जो संयम शिकलो आहे तो पाळतो आहोत, जर असा पक्ष वाढवायचा असेल तर तो त्यांना लखलाभ,असे संजय शिरसाट म्हणाले.
संजय शिरसाट म्हणाले की, पैसा जनतेचा आहे, आपल्याकडे वॉचमनकी दिलेली आहे जनता आपली मालक असून तो पैसा जनतेचा आहे. नाही तर हा पैसा आपण घरी घेऊन गेलो असतो. मालक म्हणून सत्ता चालवणे सोपं नाही. अनेक हुकूमशहाचे राज्य गेले आहे.आपण जनतेचे सेवक म्हणून वागले तर बरे राहील.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली आहे, त्यांच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत त्यांनी ठरवल्याप्रमाणे आम्ही कोणत्याही भाजप पदाधिकाऱ्याला प्रवेश देत नाही. पण भाजपने आमचे उमेदवार आणि पदाधिकारी फोडणे हे कितपत योग्य आहे? असा सवाल शिरसाट यांनी केला आहे. आम्ही जर तालुका लेव्हल वरील कार्यकर्ता घेतला तर त्यांना वाइट वाटू देऊ नये. हे मुद्दाम होत आहे की स्थानिक लेव्हलची मस्ती आहे हे एकदा पाहावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
संजय शिरसाट म्हणाले की, वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आम्ही जर एखादे पाऊल उचलले तर त्यांचे वाईट वाटून घेऊ नका. सुरवात त्यांनी केली असली तरी आम्ही अजूनही संयम राखला आहे, पण तो जास्त काळ टिकणार नाही. याचा सर्व निर्णय एकनाथ शिंदे घेतील. प्रत्येकवेळी चुकी करायची आणि त्यावर पांघरुन घालायचे मला वाटते ही नीती बरोबर नाही. यामुळे नाराजी वाढते,
कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोणत्या खुशीने भाजपसोबत गेला त्यांच्यावर काय दबाव होता. गंगापूर, वैजापूर, रत्नपूरमध्येही जर हेच सुरू असेल तर महायुती म्हणून रोल काय? म्हणून हे थांबले पाहिजे. या निवडणुकीचा परिणाम येणाऱ्या मनपा आणि जिल्हा परिषद निवडणुकीवर होऊ शकतो असा इशाराही शिरसाट यांनी दिला आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, प्रत्येक पक्ष जर पूर्वतयारी म्हणून हे लोक फोडायचे त्या पक्षाचे लोक फोडायचे असे करत असेल तर महायुती म्हणून निवडणूक लढवता येणार नाही. यावर काय व्यक्त व्हायचे याचा निर्णय एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला पाहिजे. रोज जर फोडाफोडी वर बोलायचे की प्रचार करायचा यावर काही ठरले पाहिजे.
संजय शिरसाट म्हणाले की, अजित पवार अर्थमंत्री असल्याने निधीबाबत त्यांना अधिकार असतात. पण मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री असतात. त्यांच्याकडे सर्व अधिकार असतात हे निर्विवाद आहे ते नाकारता येत नाही. तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असो मालक कुणीही असे पण खर्च कसा करायचा हे सर्वांना सोबत घेत ठरवले जाते. तिजोरीतून आम्हाला जे हवे आहे ते आम्ही घेत असतो निधी कमी पडला तर यावर आम्ही भाष्य करु.
Some people in Sambhajinagar are enjoying money, Sanjay Shirsat attacks BJP
महत्वाच्या बातम्या
- District Collector : निवडणूक प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
- Shiv Sena, : शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणी पुढील वर्षी जानेवारीमध्ये
- कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र, ड्रग प्रकरणातील आरोपींच्या भाजप प्रवेशावरून नाना पटोले यांचा सवाल
- काेरेगाव पार्क जमीन प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा, अंजली दमानिया यांची मागणी



















