विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य निवडणूक आयोगाचा सर्व्हर दुसराच कोणी तरी चालवतोय, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी केला. Jayant Patil
आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने इतर पक्षांसह मंगळवारी महाराष्ट्र निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. या भेटीवेळी चर्चा अर्धवट राहिल्याने आज पुन्हा एकदा सर्वपक्षीय शिष्टमंडळाने निवडणूक आयोगासोबत बैठक घेतली. शिष्टमंडळामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शेकापचे जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, रईस शेख, अनिल परब, अनिल देसाई, अजित नवले, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे उपस्थित होते. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे यांच्यासमोर अनेक मुद्दे मांडले आहेत. सव्वातास चाललेल्या बैठकीनंतर सर्वपक्षीय शिष्टमंडाळाने शिवालय येथे पत्रकार परिषद घेतली.
जयंत पाटील म्हणाले, आम्ही दुपारनंतर नाव चेक केलं. तेव्हा ६ वाजता सुषमा गुप्ता यांचं नाव त्यातून काढलं गेलं. न्यूज चॅनलने बातमी दाखवली. तुम्हीच पुरावा दाखवला. दुपारी ३ वाजता नाव असतं. संध्यकाळी ६ वाजता हे नाव काढलं. ही नावे कुणी काढली, कुणी स्थळ पाहणी कोणी केली. तक्रार कोणी केली. व्हेरिफिकेशन करण्याच्या आत नावं काढलं. राज्य निवडणूक आयोगाचा सर्व्हर दुसरा कोणी तरी चालवतोय असा मतदार याद्यात दुसरा कोणी तरी नाव घालतो. नाव काढतो. कुणी तरी बाहेरचा व्यक्ती सिस्टिम ऑपरेट करतो. राज्य निवडणूक आयोगाच्या हातात यंत्रणा राहिली नाही, असा आमचा समज झाला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या काही जबाबदाऱ्या आहेत, असं सीईओंनी सूचवलं. त्यामुळे राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. सर्व विरोधी पक्षनेते सोबत गेलो. आम्ही काही पुरावे दाखवले. त्या पुराव्यासहीत आम्ही काही माहिती दिली. या पुराव्याबरोबरच त्यांना पत्रही दिल्याचे सांगून जयंत पाटील म्हणाले, मी काही उदाहरणं दिली. मुरबाड मतदारसंघात बुथ क्रमांक ८ मध्ये ४०० मतदार आहेत. त्यांच्या घरासमोर डॅश आहे. बडनेरा बुथ क्रमांक २११ मध्ये घर क्रमांक शून्य, कामठीतही ८६७ मतदारांचा घर क्रमांक निरंक आहे.
काही ठिकाणी दुबार नावे, पाच पाच वेळा मतदान करण्याचा हक्क अनेक मतदारांना दिलाय. नालासोपारात सुषमा गुप्ता या महिलेचं नाव सहा वेळा नोंदवलं आहे. पुराव्यासह दाखवले होते. आम्ही दुपारनंतर नाव चेक केलं. तेव्हा ६ वाजता सुषमा गुप्ता यांचं नाव त्यातून काढलं गेलं. न्यूज चॅनलने बातमी दाखवली. तुम्हीच पुरावा दाखवला. दुपारी ३ वाजता नाव असतं. संध्यकाळी ६ वाजता हे नाव काढलं. ही नावे कुणी काढली, कुणी स्थळ पाहणी कोणी केली.
Someone else is running the State Election Commission’s server, alleges Jayant Patil
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा