विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनोज जरांगे याचे लाड बंद करा, आंदोलन संपल्यानंतर त्याला उचला आणि अटक करा, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
माजी न्या. संदीप शिंदे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगेंवर हल्लाबोल केला. यावेळी सदावर्ते यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर देखील टीका केली. ते म्हणाले, मनोज जरांगे याचे जे मसिआ आहेत त्यांना कधीही गणेशभक्त माफ करणार नाहीत.
स्टेजवर जरांगे अर्वाच्च भाषेत बोलतो. काल स्टेजवर जरांगे बोलला की धनगर समाजाच्या मध्ये बांबू घातला. एका समाजाचा अपमान करण्याचा अधिकार याला आहे का? न्यायमूर्ती शिंदे समोर जरांगे म्हणाला की हे सरकार चाबरं आहे… चाबऱ्या झ*न्याचं आहे. उद्धव ठाकरे शरद पवार तुम्ही हे ऐकताय आणि त्याचा लाड तुम्ही करताय? मनोज जरांगे सगळ्यांचा अपमान करतो सरकारचा अपमान करतो, तुम्हाला याचा कळवळा आहे, असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी केला.
मुंबई महापालिकेने सेल्फी पॉइंट इथे केलेल्या पाँडच्या पाण्यामध्ये तुम्ही अंघोळ करता, तुम्ही मराठा बांधव नाहीत तुम्ही स्पॉन्सर्ड कार्यकर्ते आहात. राज्यातले सर्व मराठा पुढारी गेमिंग करत आहेत का? मराठी नसलेला मुख्यमंत्री असला की मग चुळबूळ चुळबूळ करत आहेत. जरांगेची भाषा ही गावगाड्याची भाषा नाही तर माजुरडी भाषा आहे, अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली.
Stop pampering Manoj Jarange, pick him up: Gunaratna Sadavarte’s demand
महत्वाच्या बातम्या
- किती माजलाय तो जरांग्या, भाषा मग्रुरीची : गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबाेल
- मंत्र्याला काढण्याची घटनेतच तरतूद तर घटना दुरुस्ती कशासाठी, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
- न्यायदेवता अन्याय करणार नाही, मुंबईत जाणारच : मनाेज जरांगेंचा निर्धार
- एकेरी भाषा, आयाबहिणींवर अपशब्द खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनाेज जरांगेंना इशारा