विशेष प्रतिनिधी
मुंबई : छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांना मारहाण केल्याप्रकरणी पक्षातून निलंबित करण्यात आलेले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांना तीन आठवड्याच्या आतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘प्रमोशन’ दिले. चव्हाण यांची आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळणारे तात्कालिन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात छावाचे पदाधिकारी विजय घाटगे यांनी २० जुलै रोजी लातुरात प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यासमोर ‘पत्ते फेको’ आंदोलन केले होते. याच रागातून सूरज चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी घाटगे यांना तटकरेंसमक्ष बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी चव्हाण यांच्यासह ९ जणांना अटक व लगेच सुटकाही झाली होती. या कृत्यामुळे राज्यभर संताप व्यक्त होत असल्यामुळे २३ जुलै रोजी अजित पवार यांनी चव्हाण यांना पक्षातून निलंबित केले होते, त्यांचे युवक प्रदेशाध्यक्षपदही काढून घेतले होते. त्यामुळे ‘छावा’चा राग काहीसा शांत झाला होता. मात्र आता सूरज चव्हाण यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’! असा संताप व्यक्त करत म्हटले आहे की, लातूरमध्ये केलेल्या गुंडगिरीप्रकरणी पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेण्याचा अजितदादांचा निर्णय योग्यच होता, परंतु महिनाभराच्या आतच त्या वादग्रस्त पदाधिकाऱ्याचे प्रमोशन केले जात असेल तर याला काय म्हणायचं? अजितदादांच्या पक्षात दोन गट असून दुसरा भाजपप्रेमी गट जाणूनबुजून अजितदादांची प्रतिमा खराब करण्यासाठी कार्यरत असतो. ‘शब्दाला पक्का’ या अजितदादांच्या प्रतिमेला धक्का देण्यासाठी कालची वादग्रस्त नियुक्ती केली गेली अशी चर्चा आहे. मारहाण करताना फ्रॅक्चर झालेल्या हातावरील प्लास्टरचा पट्टा निघण्याच्या आतच प्रमोशन केलं, नियुक्ती करणाऱ्याच्या हिमतीला दाद द्यावी लागेल.
Suraj Chavan, who assaulted Chhawa Sanghatana’s state president Vijay Ghatge, promoted, appointed as state general secretary
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला