सुषमा अंधारेंनी मांडली सचिन घायवळच्या गुन्ह्यांची कुंडली, गृहराज्य मंत्री याेगेश कदम यांच्या दाव्याला उत्तर

सुषमा अंधारेंनी मांडली सचिन घायवळच्या गुन्ह्यांची कुंडली, गृहराज्य मंत्री याेगेश कदम यांच्या दाव्याला उत्तर

Sushma Andhare

विशेष प्रतिनिधी

पुणे : कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना दिल्या प्रकरणावरून राजकीय वातावरण पेटले आहे. सचिन घायवळ याच्यावर गुन्हे दाखल नसल्याने शस्त्र परवान्याची परवानगी दिल्याचा दावा गृहराज्य मंत्री याेगेश कदम यांनी केला हाेता. २०१० पासून सचिन घायवळवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती देऊन शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कदम यांना उत्तर दिले आहे.

सुषमा अंधारे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सचिन घायवळवर कोथरूड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 118 /2010 भा द वि कलम 143 147 ,148, 149 , 307, 427, 428 सह शस्त्र अधिनियम 1959 मधील कलम 3 4 25 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 एक, 135, 142 अन्वये गुन्हा दाखल आहे. दत्तवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 82 ऑब्लिक 2010 भारतीय दंड विधान कलम 120 व 302, 307, 343, 147, 148, 149 सह शस्त्र अधिनियम 1959 मधील कलम 3, 4, 25 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 1 सह 135 मोका कलम 3 (1)(1), 3 (1)(2), 3(4) अन्वये गुन्हा दाखल आहे. शिवाजीनगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 3082/2025 महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सुषमा अंधारे यांनी ट्वीट करताना म्हटले आहे की, कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ याच्या शस्त्र परवाना प्रकरणांमध्ये बुधवारी (08 ऑक्टोबर) गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, शस्रपरवाना देत असताना सचिन घायवळवर कुठलाही गुन्हा दाखल नव्हता. परंतु सचिन घायवळ याच्यावर फक्त खुनाचा गुन्हा नाही, तर मोक्का अंतर्गत सुद्धा गुन्हे दाखल होते. विशेष म्हणजे अशा व्यक्तीला शस्र परवाना दिला जाऊ नये, असा पोलिसांचा अहवाल होता. तरीसुद्धा योगेश कदम यांनी स्वतःच्या अधिकार कक्षेमध्ये हा विशेष परवाना देऊ केला.

याचा अर्थ योगेश कदम यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत एका गुंडाला अभय देण्याचा आणि त्याला बळ पुरवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे योगेश कदम यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी तत्काळ गृहराज्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करत सुषमा अंधारे यांनी सचिन घायवळ याच्यावरील गुन्ह्यांचे पुरावे दिले आहेत.

Sushma Andhare presents the horoscope of Sachin Ghaiwal’s crimes

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023