पुणे : भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी वराह जयंती साजरी करण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. नितेश राणे यांना आपल्या पूर्वजांचा विसर पडला नाही, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी वराह जयंतीच्या दिवशी वराह अवतारामध्ये जयंती साजरी करावी
नीतेश राणेंनी 25 ऑगस्ट रोजी वराह जयंती राज्यभरात साजरी करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. हिंदू धर्मातील दशावतारांपैकी वराह हा तिसरा अवतार आहे. ते वसुंधरेचे रक्षक आणि दुष्ट प्रवृत्तींचा नाश करणारे आहेत. वराह देवाची पूजा केल्याने समाजात धर्म, सदाचार आणि पर्यावरण रक्षणाची जाणीव निर्माण होते, असे नीतेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.
यावर निशाणा साधताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, नीतेश राणे कायम बडबडत असले तरी कधीकधी त्यांची विधाने अत्यंत महत्त्वाची असतात आणि ती गांभीर्याने घेतली पाहिजे. वराह जयंतीच्या निमित्ताने त्यांनी केलेले विधान फार महत्त्वाचे आहे. त्यांनी केलेले आवाहन की आपण वराह जयंती साजरी केली पाहिजे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्याला जरी विसर पडला असला तरी नीतेश राणे यांना आपल्या पूर्वजांचा विसर पडलेला नाही. ते हा सर्व उत्सव साजरा करु इच्छिता ही अगदी चांगली गोष्ट आहे.
दही हंडी मध्ये जसे सर्व ठिकाणी गोविंदाच्या टोळ्या वावरतात. अगदी त्याच पद्धतीने नीतेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी हा दिवस साजरा करताना एक संपूर्ण दिवस वराह अवतारामध्ये काढायला हवा.वराह अवतारामध्ये जर त्यांनी जयंती साजरी केली तरच ही जयंती खऱ्या अर्थाने साजरी होईल.
दरम्यान, राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे :
- 25 ऑगस्ट हा दिवस राज्यभर ‘वराह जयंती उत्सव दिन’ म्हणून घोषित करावा.
- शासनामार्फत जिल्हा पातळीवर आणि प्रमुख शहरांमध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करावे.
- शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वराह देवाच्या इतिहासावर आणि संदेशावर व्याख्याने आयोजित करावीत.
- मंदिरांमध्ये विशेष पूजा-अर्चा आणि भक्ती कार्यक्रमांचे आयोजन करावे.
Sushma Andhare Takes a Jibe at Nitesh Rane on Varaha Jayanti, Says Ancestors Are Not Forgotten”
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला