विशेष प्रतिनिधी
मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात १७ वर्षांनंतर सर्व सात आरोपींना पुराव्याच्या अभावामुळे विशेष एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. यात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचाही समावेश आहे. आतंकवाद भगवा न कभी था, ना है और ना…असे मुख्यमंत्री (Chief Minister) देवेंद्र फडणवीस यांनी या निकालावर म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, काँग्रेसच्या यूपीए सरकारवर ‘भगवा दहशतवाद’चा आरोप केला आहे. मालेगावमधील भिक्कू चौकात २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयाने आज निकाल दिला. या प्रकरणात तपास यंत्रणांकडून पुराव्यांच्या अभावी सर्व ८ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यात भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह ७ आरोपींचा समावेश होता. याप्रकरणी न्यायालयाने केवळ संशयाच्या आधारावर कुणालाही शिक्षा देता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश दिले. आता याप्रकरणी विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी मुख्यमंत्री (Chief Minister) देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “आतंकवाद भगवा न कभी था, ना है, ना कभी रहेगा”, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे की, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील विशेष एनआयए न्यायालयाचा निकाल केवळ न्यायालयीन निर्णय नाही, तर तो एका दीर्घकाळ चाललेल्या राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश आहे.
सर्व आरोपांमागे कोणताही ठोस पुरावा नाही, हे न्यायालयाने स्पष्टपणे नोंदवलं. पण याहून गंभीर बाब म्हणजे काँग्रेसनं जाणीवपूर्वक “हिंदू दहशतवाद” हा शब्दप्रयोग प्रचारात वापरत हिंदू समाजाला, श्रद्धेला, जगभरात बदनाम करण्याचा प्रयत्न केला. शतकानुशतकं मानवतेचं आणि सहिष्णुतेचं प्रतीक असलेल्या हिंदू धर्माला दहशतवाद्यांच्या रांगेत उभं करण्याचा अक्षम्य गुन्हा काँग्रेसने केला.
आज कोर्टाने सत्य मांडलं, आता काँग्रेसनं हिंदू समाजाची माफी मागायला हवी! हिंदू कधीच दहशतवादी नव्हता आणि नसेलही
न्यायालयाच्या आजच्या निर्णयाने हिंदूंना बदनाम करणाऱ्यांना मोठी चपराक मिळाली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ‘हिंदू दहशतवाद’ नावाचा भंपक शब्द काँग्रेसी षडयंत्रकारी नेत्यांनी चलनात आणला. याच्यासारखा धादांत त्यांच्यापाशी आता काय उत्तर आहे? असा सवाल केला आहे.त्यांनी म्हटले आहे की, सत्य कधी पराभूत होत नाही. सतरा वर्षांच्या दीर्घ लढाईनंतर मालेगाव बॉम्बस्फोटातील सात कथित आरोपींची विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. न्यायाला उशीर झाला हे खरं आहे, पण सत्य कधीही पराजित होत नसतं, हे पुन्हा एकवार सिध्द झालंय.
मालेगावच्या स्फोटांप्रकरणी खोटे आरोप करुन तुरुंगात डांबण्यात आलेल्या देशभक्तांना शिवसेनेनं पहिल्यापासूनच निसंदिग्ध पाठिंबा दिला होता. कारण आपली बाजू न्यायाची आहे, याबद्दल शिवसेनेला कधीही संदेह नव्हता. कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा आदी सात जणांना या आरोपामुळे प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागलाय. हा अन्याय हिंदू जनता कधीही विसरणार नाही.
हिंदू कधीही देशविरोधी कृत्यं करु शकत नाही, कारण देशभक्ती हे हिंदूधर्मीयांसाठी धर्मकार्यच असतं. हिंदू दहशतवाद’ नावाचा भंपक शब्द काँग्रेसी षडयंत्रकारी नेत्यांनी चलनात आणला. याच्यासारखा धादांत त्यांच्यापाशी आता काय उत्तर आहे?
एक काळंकुट्ट पर्व आज संपलंय. हिंदू धर्मीयांवरचा कलंक पुसला गेलाय. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ ही घोषणा आता शंभरपट मोठ्या आवाजात देशभर दुमदुमेल, यात शंका नाही. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं!
सुधीर मुनगंटीवार म्हणाले?,
“जेव्हा हा खटला दाखल झाला, तेव्हा अनेक नेत्यांनी काही निरपराध लोकांना यामध्ये गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त केला होता. तसेच, या खटल्यात राजकारण होत आहे का, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली होती. आज जेव्हा आरोपींची निर्दोष मुक्तता झाली, तेव्हा त्यावेळच्या शंकांमध्ये तथ्य असल्याचे सिद्ध झाले आहे. जर सरकारने त्यावेळी योग्य पुरावे दिले असते, तर गुन्हेगार सुटले नसते. या निर्दोष मुक्ततेमुळे तेव्हाच्या शंका खऱ्या ठरल्या आहेत.
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी या निर्दोष मुक्ततेला काँग्रेसच्या विकृत राजकारणाला दिलेली चपराक असे म्हटले आहे. त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदू दहशतवाद हा शब्द वापरला होता. काँग्रेसने हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचा कट रचला, असा आरोप केशव उपाध्ये यांनी केला. त्यांच्या मते, हा हिंदू समाजाची बदनामी करण्याचा व्यापक कट होता. यासाठी कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. तेव्हा राज्य आणि केंद्र दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे सरकार होते आणि त्यांनी खोटे पुरावे रचले. त्यामुळे काँग्रेसने हिंदू समाजाची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
छगन भुजबळ यांनी निर्दोष मुक्ततेच्या निकालावर वेगळ्या पद्धतीने भाष्य केले. “आरोपींची निर्दोष मुक्तता झाली असली तरी, 17 वर्षांनंतर निकाल येत असेल, तर ते शिक्षा भोगल्यासारखेच आहे. यात हिंदू दहशतवाद नावाची कोणतीही गोष्ट नव्हती”, असे छगन भुजबळ म्हणाले.