विशेष प्रतिनिधी
मुंबई : नाशिक जिल्ह्यातील शिवसेना (ठाकरे गट) चे प्रमुख नेते आणि भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेत असलेले सुधाकर बडगुजर यांनी अखेर रविवारी मोठ्या शक्तिप्रदर्शनासह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या सोबत बबनराव घोलप यांनीही भाजपमध्ये प्रवेश घेतला. यामुळे ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. भाजपने आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ताकद वाढवली आहे.
सुधाकर बडगुजर यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह ढोल-ताशांच्या गजरात नरीमन पॉइंट येथील भाजप कार्यालयात प्रवेश केला . प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण हे नेते उपस्थित होते.
प्रवेशानंतर बोलताना बडगुजर म्हणाले, “मी समाजासाठी काम केले, कोविड काळात कोणी बाहेर पडत नव्हते, तेव्हा मी कोविड सेंटर सुरू केले. पण ज्यांनी मला संधी दिली, त्यांनीच माझा अपमान केला. त्यामुळे मला त्या पक्षाने काय माहिती दिली हे महत्त्वाचे नाही, पण आता भाजपमध्ये येऊन मी खरी सेवा करणार आहे.”
ते पुढे म्हणाले, “ज्यांनी माझा अनादर केला त्यांना मी इतकंच सांगतो की महापालिका निवडणुकीत दूध का दूध, पाणी का पाणी होईल. गिरीश महाजन हे खरे ‘आपत्ती व्यवस्थापन मंत्री’ आहेत. त्यांनी माझ्या समस्येवर मार्ग काढून मला इथे आणलं.” त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही विशेष कौतुक केले आणि भाजपचे नेतृत्व महाराष्ट्राला नवा मार्ग दाखवत असल्याचे म्हटले.
बबनराव घोलप म्हणाले की, “बडगुजर साहेबांचा अपमान झाला, म्हणून मी देखील त्यांच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला. सामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान नसेल, तर अशा पक्षात राहण्यासारखे काहीच राहत नाही.”
गिरीश महाजन म्हणाले, “नाशिक आपला बालेकिल्ला आहे, आणि आता अब की बार 100 के पार हे आपले लक्ष्य आहे. पक्ष वाढवणं म्हणजे दलाली नाही, तर ही निष्ठा आणि कर्तृत्वाची लढाई आहे.”
रवींद्र चव्हाण नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना म्हणाले की “पक्षात मतभेद असले तरी मनभेद नाहीत. जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करायचा आहे. भाजपमध्ये कोणालाही परकं वाटणार नाही.”
या प्रवेशामुळे नाशिक महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला नवा उत्साह मिळाला आहे. बडगुजर हे नाशिकमध्ये प्रभावशाली नेतृत्व मानले जात असून, त्यांचा पक्षांतर्गत प्रभाव आणि कार्यकर्त्यांचे जाळे लक्षात घेता हा भाजपसाठी निवडणुकीत मोठा ‘गेमचेंजर’ ठरू शकतो.
Thackeray group suffers a big setback in Nashik, Sudhakar Badgujar and Babanrao Gholpa join BJP with a show of strength
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी