विशेष प्रतिनिधी
नाशिक : ब्राह्मण समाजाची संख्या जरी अल्प असली तरी त्यांचे कार्य मात्र समाजासाठी अत्यंत मोलाचे आहे. दुधात साखर घातल्यावर जसे गोडवा निर्माण होतो, तसेच ब्राह्मण समाजाचे कार्य समाजात सौहार्द, विद्वत्ता आणि मूल्यसंवर्धन करणारे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले.
नाशिकमध्ये चित्तपावन ब्राह्मण संघटनेच्या वतीने आयोजित परशुराम भवनच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मण समाजाच्या ऐतिहासिक आणि आजच्या काळातील योगदानाचा गौरव केला.फडणवीस म्हणाले, “भारताच्या इतिहासातील कोणतेही क्षेत्र पाहिले, जसे की स्वातंत्र्य चळवळ, कला, साहित्य, शिक्षण, न्याय व प्रशासन या प्रत्येक क्षेत्रात चित्तपावन ब्राह्मणांचा मोठा वाटा आहे. दहा थोर व्यक्तींची नावे घेतली तरी त्यात तीन-चार चित्तपावन ब्राह्मण असतात हे ठळकपणे जाणवतं.”
मुख्यमंत्री म्हणाले की, “आज या भव्य परशुराम भवनाच्या उद्घाटनाची संधी मला लाभली, याबद्दल मी संघटनेचे मन:पूर्वक आभार मानतो. हे केवळ एक भवन नाही, तर ब्राह्मण समाजाच्या आत्मबळाचे प्रतीक आहे. याच ठिकाणी हॉस्टेल उभारले गेले आहे, जे गरजू विद्यार्थ्यांना मोठा आधार देणार आहे.”
जातीय व्यवस्था नकोशी वाटत असली तरी प्रत्यक्षात ती संपूर्णतः दूर गेलेली नाही. त्यामुळे सामाजिक समतेसाठी आपण प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. समाजाची प्रगती ही सामूहिक असावी, केवळ काही मंडळी पुढे जाऊन थांबू नयेत, तर त्यांनी इतरांना सोबत घेऊन पुढे न्यायला हवे. दानधर्म, शिक्षणासाठी मदत, आणि सामाजिक भान ही मूल्ये पुढील पिढीमध्ये रुजवणे आवश्यक आहे., असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
फडणवीस म्हणाले, 1933 साली झालेल्या संस्थेच्या पहिल्या सभेचे इतिवृत्त आज वाचताना अभिमान वाटतो. समाजाने पुढे जावे, पण त्याच वेळी मागे राहिलेल्यांना मदतीचा हात देणे ही खरी संस्कृती आहे.
The contribution of the Brahmin community is like sugar in milk, asserts Chief Minister Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- Kumar Vishwas पाकिस्तानला महिलांची ताकद दाखवून दिली, राष्ट्रीय महिला आयोगाच्या सोहळ्यात कुमार विश्वास यांचे प्रतिपादन
- Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगावच्या रिंगणात, बिनविरोध निवड होऊ देणार असल्याचा विरोधकांचा इशारा
- Narendra Modi : गोळीला आता गोळ्याने उत्तर मिळेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा
- Sanjay Raut : जे भाजपाला ‘चंदा’ देतील त्यांचा धंदा जोरात, संजय राऊत यांची टीका