उत्सव अनेकांच्या मनाला वेदना देणारे, अमित ठाकरेंनी तिरंगा यात्रेची थेट पंतप्रधानांकडे केली तक्रार

उत्सव अनेकांच्या मनाला वेदना देणारे, अमित ठाकरेंनी तिरंगा यात्रेची थेट पंतप्रधानांकडे केली तक्रार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमध्ये असलेले दहशतवादी अड्डे उद्धवस्त केले. यावेळी फक्त सत्ताधारीच नव्हे तर विरोधकांनीदेखील त्यांनी उचललेल्या या पावलांचे कौतुक केले होते. भारतीय जनता पक्ष तिरंगा रॅली काढून जल्लोष साजरा करत आहे. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित यांनी त्याला आक्षेप घेतला आहे. थेट पंतप्रधानांना पत्र पाठवून हे उत्सव अनेकांच्या मनाला वेदना देणारे असल्याचे म्हटले आहे.

अमित ठाकरे यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपल्या नेतृत्वात देशाने अनेक महत्त्वपूर्ण टप्प्यांवर निर्णायक वाटचाल केली. विशेषतः राष्ट्रीय सुरक्षेबाबत आपण घेतलेले कठोर पण आवश्यक निर्णय देशहितासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहेत. याबद्दल आपले आभार. सध्या सीमारेषेवर निर्माण झालेल्या स्थितीमुळे जनतेचे लक्ष पूर्णपणे आपल्या भारतीय सैन्याकडे केंद्रित झाले. ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या शूर सैनिकांनी दाखवलेले धाडस, शिस्त, समर्पण आणि राष्ट्रासाठीचा त्याग हे संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आणि गौरवास्पद आहे. भारतीय लष्कराने आपल्या शौर्याने संपूर्ण देशाच्या हृदयात अढळ स्थान मिळवले आहे. आज देशात प्रत्येक घरातून, चौकात, सोशल मीडियावरून सैनिकांच्या कार्याला सलाम केला जात आहे. सैन्याच्या प्रत्येक हालचालीकडे आज देश प्रेमाने आणि गर्वाने पाहत आहे. त्यांच्या अद्वितीय शौर्यामुळेच आपण सुरक्षित आहोत आणि म्हणूनच त्यांचे कार्य कुठल्याही सन्मानापेक्षा मोठे आहे.



अमित ठाकरे यांनी पुढे लिहिले आहे की, “या पार्श्वभूमीवर सध्या काही ठिकाणी विजयाचे प्रतीक म्हणून जे उपक्रम राबवले जात आहेत. त्याबाबत समाजात भावनिक संभ्रम आहे. ही परिस्थिती विजयाची नसून युद्धविराम आहे. ज्या घटनेत आपल्या शूर जवानांनी प्राणत्याग केला, त्याच काळात साजरे होणारे उत्सव अनेकांच्या मनाला वेदना देणारे आहेत. या काळात जर काही अभिव्यक्त करायचे असेल, तर ते आपल्या सैनिकांचे बलिदान, त्यांच्या शौर्यगाथा आणि त्यांच्या कुटुंबांचे अद्वितीय धैर्य असावे. पण सध्या काही ठिकाणी जी आनंददर्शक आंदोलने किंवा विजय यात्रा (मुख्यत्वे राजकीय स्वरूपातील) या समर्पक वाटत नाहीत. या क्षणी देशवासीयांच्या मनात एकच भावना आहे, शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी दीर्घकालीन कल्याणकारी उपायांची गरज आहे, आणि या बलिदानाच्या पार्श्वभूमीवर समाज म्हणून आपण अधिक संवेदनशील राहण्याची आवश्यकता आहे.

“जरी सध्या युद्धविराम जाहीर झाला असला तरी पाकिस्तानच्या गतइतिहासाचा विचार करता त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणे कठीण आहे. त्यांनी यापूर्वीही अनेकवेळा अशाच संधींमध्ये दगाफटका केलेला आहे. त्यामुळे अशा स्थितीत समाजातील नागरिकांना सजग ठेवणे, युद्धजन्य परिस्थितीत त्यांना काय करावे याचे मार्गदर्शन करणे तसेच त्यांची मानसिक तयारी घडवून आणणे हेही सरकारच्या धोरणाचा महत्त्वाचा भाग ठरायला हवा.” असे अमित ठाकरे म्हणाले. तसेच, “पंतप्रधान मोदी आपल्याकडून आजही देशवासियांना हा विश्वास आहे की, आपण सैनिकांच्या योगदानाबाबत संवेदनशील आणि कृतज्ञ आहात. आणि म्हणूनच, या पत्राद्वारे एक मनापासूनची विनंती करतो की, युद्धाचा निकाल अजून स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा आणि देशासाठी शहीद झालेल्या वीरांना खरी श्रद्धांजली म्हणून या काळात संयम बाळगावा.” असे ते म्हणाले आहेत.

The festival is causing pain to many, Amit Thackeray complained directly to the Prime Minister about the Tiranga Yatra

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023