Bhendwal Ghatamandani : राजाला ताण, तिजोरीत खडखडाट, पण शत्रू देशाचे काही वाकडे करू शकणार नाही, भेंडवळ घटमांडणीत भविष्यवाणी

Bhendwal Ghatamandani : राजाला ताण, तिजोरीत खडखडाट, पण शत्रू देशाचे काही वाकडे करू शकणार नाही, भेंडवळ घटमांडणीत भविष्यवाणी

Bhendwal Ghatamandani

विशेष प्रतिनिधी

जळगाव जामोद : Bhendwal Ghatamandani राजाला प्रचंड ताण, देशाच्या तिजोरीत खडखडाट असेल पण संरक्षण व्यवस्था मजबूत राहील. त्यामुळे शत्रू आपल्या देशाचे काही वाकडे करू शकणार नाही, अशी भविष्यवाणी भेंडवळ घटमांडणीत वर्तवण्यात आली आहे.Bhendwal Ghatamandani

महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली भेंडवळ घटमांडणीचे भाकीत आज एक मे रोजी पहाटे सहा वाजता चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगधर महाराजांनी जाहीर केले. घटातील शत्रूचे प्रतीक असलेला मसूर हे धान्य थोड्या प्रमाणात दबलेले आढळले त्यामुळे शत्रूंच्या कारवाया सुरूच राहतील.

परंतु करडी धान्य म्हणजे देशाची संरक्षण व्यवस्था शाबूत असल्यामुळे संरक्षण व्यवस्था मजबूत राहील. त्यामुळे शत्रू देशाचे काही वाकडे करू शकणार नाही. परंतु देशावर संकट असल्याने राजाला प्रचंड ताण राहील देशाच्या तिजोरीत खडखडाट असेल अशी भविष्यवाणी वर्तवण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी आशादायक वर्ष असल्याचेही म्हटले आहे. जून सर्वसाधारण, जुलैमध्ये भरपूर पाऊस, ऑगस्टमध्ये साधारण पाऊस तर सप्टेंबरमध्ये भरपूर पाऊस बरसणार आहे. अवकाळी पावसाचे सुद्धा थैमान राहील त्याचबरोबर पीक परिस्थिती सर्वसाधारण राहील त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे वर्ष सर्वसाधारण राहील.

पृथ्वीवर प्रचंड संकट येतील त्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती किंवा नैसर्गिक आपत्तींचा सहभाग असू शकतो. पिकांच्या उत्पन्नाची अनिश्चितता असून भावातही तेजीमंडी असेल. कुठे कमी तर कुठे जास्त पीक येईल. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे पिकांची नासाडी सुद्धा होईल. पिकांवर रोगराई पसरेल असाही अंदाज भेंडवळच्या घटमांडणीत वर्तवला आहे.
घटामध्ये मांडलेल्या १८ धान्यामध्ये अनेक ठिकाणी फेरबदल झालेले आढळून आले त्यावरून भविष्यवाणी जाहीर करण्यात आली. भेंडवळची भविष्यवाणी ऐकण्यासाठी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The king is stressed, the treasury is in turmoil, but the enemy will not be able to harm the country, a prediction in Bhendwal Ghatamandani

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023