विशेष प्रतिनिधी
पणजी : ओबीसी समाजाबद्दल बोलल्याबद्दल माझ्यावर टीका झाली. मला टार्गेट करण्यात आलं. मला कितीही टार्गेट केलं तरीही मी ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढणार आहे आणि माझी लढाई चालूच राहणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. Devendra Fadnavis
गोव्यामध्ये ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी आहेत. आपल्या राष्ट्रीय स्तरावर ओबीसींचा बोलबाला झाल्याचे आपल्याला बघायला मिळाले. हेच नाही तर स्वातंत्र्य काळानंतर सर्वात जास्त ओबीसींना मंत्रिमंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थान दिले.
मी आज मुख्यमंत्री आहे, मला ओबीसी समाजासह सर्व समाजाने आर्शिवाद दिलाय. एखाद्या समाजासाठी लढणार म्हणजे दुसऱ्या समाजाच्याविरोधात आहे, असे चित्र रंगवणे चुकीचे आहे. आम्ही ओबीसी समाजासाठी 50 महत्वाचे निर्णय घेतले आहेत. ओबीसी समाजाला त्याचे आरक्षण परत मिळाले. काही लोक याच्याविरोधात कोर्टात केले. कोर्टाते महत्वाचा निर्णय देत ओबीसींना त्यांचे हक्काचे 27 टक्के आरक्षण दिले, असे सांगून फडणवीस म्हणाले की, समाजाचे कार्य असेलच पाहिजे, त्यामुळेच समाजाचे कल्याण होते. ओबीसी समाजासाठी आम्ही कुठेही निधीची कमी पडू देणार नाहीत. आम्ही अधिवेशनात पुरवणीच्या माध्यमातून या मागण्या पूर्ण करू. महाराष्ट्रप्रमाणेच गोव्यात देखील ओबीसी समाजासाठी आपण चांगले निर्णय घेऊ.
फडणवीस म्हणाले की, ओबीसी महासंघाची सुरूवात 2005 मध्ये एका छोट्याशा खोलीतून झाली. ओबीसी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार. संधीचा उपयोग करून ओबीसींसाठी चांगले निर्णय घेईल. साततत्याने माझा संबंध हा ओबीसी महासंघाशी होता. आपल्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची सुरूवात आपण केली आणि आता अनेक विद्यार्थी त्याला लाभ घेऊन विदेशात शिक्षण घेत आहेत.
the OBC community will fight for its rights, believes Chief Minister Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- Dnyaneshwari Munde : महादेव मुंडे यांना ओळखत नव्हता तर पोलिसांना का कॉल केले? ज्ञानेश्वरी मुंडे यांचा सवाल
- Uddhav Thackeray हिंदूंना बदनाम करण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचा सवाल
- सच्चे भारतीय असाल तर अशी वक्तव्यं करूच शकत नाही…चीनबाबत आरोपांवरून सुप्रीम कोर्टानेच उपटले राहुल गांधींचे कान
- कोथरूड प्रकरणात पोलिसांवर कारवाई नाही; ती ओबीसी पीडित कोण ? रोहित पवारांचा पुणे पोलिसांना सवाल!