विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर : गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनी चळवळीतून उभा केलेला पक्ष हा आता प्रोफेशनल झाला आहे. ज्यांच्याविरोधात मोर्चा काढला तेच आज भाजपसोबत सत्तेत आहेत. विशेष म्हणजे त्यांचे शिष्य समजल्या जाणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) पक्षाची ही अवस्था केली याची खंत आहे असा आरोप मनसेचे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी केला आहे.
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या 11 व्या स्मृतीदिनानिमित्त त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाजन म्हणाले, पूर्वी चळवळीत काम करणारे लोक भाजपमध्ये आणले जायचे. गोपीनाथ मुंडे हे स्वतः चळवळीतून आलेले नेते होते. चळवळीतील सर्वच नेत्यांशी त्यांचे संबंध चांगले होते. आज भारतीय जनता पक्षाची अवस्था पाहिल्यावर खंत वाटते. आता भ्रष्टाचारातून भाजपात एन्ट्री मिळते. अशोक चव्हाण, अजित पवार , छगन भुजबळ यांच्यासारखे अनेक लोक आज भाजपसोबत आहेत. संभाजीनगरमध्ये सार्वजनिक सिंचन घोटाळ्यासंदर्भात एक मोर्चा निघाला होता. त्यात गोपीनाथ मुंडे यांचं डोकं फुटलं होतं. ज्याच्या विरोधात तो मोर्चा निघाला होता त्या नेत्याच्या बाजूला आज देवेंद्र फडणवीस बसतात हे दुर्दैव आहे. संघर्षाच्या वेळी अनेक लोक भाजपसोबत होते. पण सत्ता आल्यानंतर ते कुठेच नाहीत. त्यामुळे भाजप आता प्रोफेशनल पक्ष झाला आहे.
आमचे वडील हे काँग्रेसचे आणि नेहरुंच्या विचारसरणीतील. गोपीनाथ मुंडे आमच्याकडे आले की पहिला त्यांना भेटायचे. त्यावेळी आमचे वडील त्यांना म्हणायचे की गोपीनाथ, तू यांच्या नादी लागू नकोस. तू काँग्रेसमध्ये जा, मुख्यमंत्री होशील. पण दुर्दैवाने गोपीनाथ मुंडे हे मुख्यमंत्रिपदापासून फक्त एकच पाऊल मागे राहिले, अशी खंतही महाजन यांनी व्यक्त केली.
The same people against whom Gopinath Munde marched are with BJP today, Prakash Mahajan expressed regret
महत्वाच्या बातम्या
- Kumar Vishwas पाकिस्तानला महिलांची ताकद दाखवून दिली, राष्ट्रीय महिला आयोगाच्या सोहळ्यात कुमार विश्वास यांचे प्रतिपादन
- Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगावच्या रिंगणात, बिनविरोध निवड होऊ देणार असल्याचा विरोधकांचा इशारा
- Narendra Modi : गोळीला आता गोळ्याने उत्तर मिळेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा
- Sanjay Raut : जे भाजपाला ‘चंदा’ देतील त्यांचा धंदा जोरात, संजय राऊत यांची टीका