विशेष प्रतिनिधी
पुणे : Rohit Pawar : कर्जत-जामखेड मतदारसंघात पुण्यातील गुंड निलेश घायवळ सक्रीय झाल्याचा आरोप आमदार राेहित पवार यांनी निवडणुकीच्या काळात केला हाेता. आता पुण्यात घायवळ टाेळीकडून झालेल्या गाेळीबारानंतर राेहित पवार यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. हा गुंड विधान परिषदेच्या सभापतींचा खास माणूस आहे, असा आराेप पवार यांनी केला आहे.
बुधवारी मध्यरात्री कोथरूड भागात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार करण्यात आला आहे. यावरून विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यावर निशाणा साधणाऱ्या ट्वीटमध्ये राेहित पवार यांनी म्हटले आहे की, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे ज्या गुंडाला राजरोसपणे विधान भवनात घेऊन फिरतात, त्याच्या टोळीने गाडीला साईड न दिल्याच्या रागातून पुण्यात कोथरुडमध्ये भर रस्त्यात गोळीबार करून एका वाहनचालकाला जखमी केलं. आता गृहमंत्री तथा मुख्यमंत्री या गुंडाच्या टोळीवर काय कारवाई करतात, हे पाहायचं आहे. दुसरं म्हणजे हा गुंड विधान परिषदेच्या सभापतींचा खास माणूस आहे, त्यामुळे त्याला हमखास पाठीशी घालतात, हेच पहायचंय. तसेच या कारवाईनंतर हे सरकार सामान्य माणसाचं आहे की, गुंडांचं हे कळणार आहे.
निलेश घायवळ टोळीचे गुंड बुधवारी मध्यरात्री कोथरुड भागातून जात होते. यावेळी घायवळ टोळीतील मुसा शेख, रोहित आखाड, गणेश राऊत आणि मयुर कुंभारे हे गाडीत होते. त्यांच्या गाडीला एका वाहनचालकाने पुढे जाऊ दिले नाही. याचा राग आल्याने मयुर कुंभार याने वाट न देणाऱ्या गाडीवर बेछूट गोळीबार केला. त्यात प्रकाश दुरगुडे हे जखमी झाले आहेत. कोथरुडच्या शिंदे चाळ परिसरात गोळीबाराची घटना घडली. जखमीवर कोथरुडमधील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत मयुर कुंभारेने तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी दुरगुडे यांच्या मानेला आणि दुरी गोळी मांडीला लागली.
The Speaker’s special man! Rohit Pawar targets Ram Shinde over gangster Nilesh Ghaywal
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!