विशेष प्रतिनिधी
धाराशिव : MP Omraje Nimbalkar सरकारने दिवाळीपूर्वी मदत मिळेल असे सांगितले, पण आज गावोगावी पाहा, लोक अंधारात आहेत, दिवे नाहीत, वीज नाही, सण नाही. त्यामुळे सरकारने जरा वास्तव बघावे आणि शक्य असेल तर दिवाळीच काही दिवस पुढे ढकलावी, असा संताप खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केला आहेMP Omraje Nimbalkar
सीना नदीला आलेला पूर ओसरून तब्बल एक महिना उलटला असला, तरी उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे-पाथरीसह परिसरातील अनेक गावांमध्ये अजूनही वीजपुरवठा पूर्णपणे सुरळीत झालेला नाही. पूरानंतरच्या पुनर्वसनाच्या कामात झालेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांच्या घरात आजही अंधार आहे. दिवाळीसारखा सण जनरेटरच्या उजेडात साजरा करावा लागत आहे, यावर संताप व्यक्त करताना पूरग्रस्त भागांना भेट दिल्यानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की, सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होईल, अशी घोषणा केली होती. पण अजूनही अनेक गावांमध्ये ती मदत पोहोचलेली नाही. काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले, पण बँकांनी ती रक्कम होल्ड केली आहे. हे सरकारच्या दुर्लक्षाचे उदाहरण आहे.MP Omraje Nimbalkar
स्थानिक प्रशासनाच्या मते, पूराच्या पाण्यामुळे वीज खांब आणि ट्रान्सफॉर्मरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे दुरुस्तीची कामे सुरू आहेत, परंतु ग्रामीण भागात उपकरणे आणि तंत्रज्ञांची कमतरता असल्याने प्रक्रिया धीमी आहे. दरम्यान, पूरग्रस्तांनी सांगितले की, आम्हाला सांगितलं जातंय की दोन दिवसात वीज येईल, पण तो दोन दिवसांचा शब्द मागच्या महिन्यापासूनच ऐकत आहोत. आता दिवाळी आली, तरी घरात अंधारच आहे.
पूरामुळे नुकसान झालेली घरे, नष्ट झालेली शेती आणि आता विजेचा अभाव, या सर्वांनी शेतकऱ्यांचा आत्मविश्वास डळमळीत केला आहे. आमचे सगळे गेले, आता फक्त थोडे आयुष्य उरलंय तेही जनरेटरच्या आवाजात जगतोय, असं एका वयोवृद्ध शेतकऱ्याने म्हटले आहे. पूर ओसरला, पण सोलापूरच्या तिऱ्हे-पाथरी परिसरात अंधार कायम आहे. सरकारच्या घोषणा आणि जमिनीवरील वास्तव यात मोठी दरी आहे. जनरेटरच्या उजेडात साजरी होणारी दिवाळी ही त्या शेतकऱ्यांच्या संघर्षाची जिवंत साक्ष देते. आता सरकारने वीजपुरवठा सुरळीत करण्यासोबतच पूरग्रस्तांना दिलेली मदत तत्काळ वितरित करावी, अशी मागणी केली जात आहे.
Then Diwali should be postponed, MP Omraje Nimbalkar is angry that he has not received any help.
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात शिंदे – ठाकरे गटाचे नेते साथ साथ, रवींद्र धंगेकर यांना वसंत मोरेंचा पाठिंबा
- व्हिजन डॉक्युमेंट साकारणार विकसित भारताचे स्वप्न : मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- तर सर्वांची धार्मिक स्थळे अशीच लाटली जातील, जैन बोर्डिंग प्रकरणावरून रवींद्र धंगेकर यांचा इशारा
- औरंगजेबाच्या कबरीजवळ दिवा लावून दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस घ्या..