विशेष प्रतिनिधी
ठाणे : महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. निवडणुकीला अजून दोन महिने शिल्लक आहेत. तोपर्यंत सबुरीने घ्या, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंत्री गणेश नाईक, आ. संजय केळकर यांना कानपिचक्या दिल्या आहेत. Ravindra Chavan
गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात भाजप स्वबळावर महापालिका निवडणूक लढवणार, असा दावा मंत्री गणेश नाईक व संजय केळकर करीत आहेत. महायुतीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या पातळीवर होईल, असे रवींद्र चव्हाण म्हणाले
ठाण्यातील भाजपच्या पक्ष कार्यालयात शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या कोकण विभागीय बैठकीनंतर रवींद्र चव्हाण पत्रकारांशी बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिंदेसेनेच्या स्थानिक पातळीवर बैठका होत आहेत. शिंदेसेनेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी भाजप नेत्यांच्या विरोधात नाराजीचा सूर लावला. गुरुवारी शिंदेसेनेने आक्रमक पवित्रा घेतला अजित पवार गटाच्या नेत्यांनीही स्वबळाची भाषा केली. या पार्श्वभूमीवर महायुतीत बेबनाव निर्माण होऊ नये, याकरिता प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी आपल्या नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला. याप्रकरणी आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
पुढील दोन महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आता दिवाळी सुरू होत आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी सुटीच्या मूडमध्ये आहेत, त्यांना आगामी निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागा, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले. निवडणुका लढताना त्या-त्या ठिकाणच्या आरक्षणांचा विचार केला जातो. त्या आरक्षणांची कागदपत्रे गोळा करणे ही जबाबदारी स्थानिक पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. तसेच, उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी समिती स्थापन केली आहे.
There are still two months left for the elections, wait patiently till then, says Ravindra Chavan’s earworm
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा