विशेष प्रतिनिधी
बुलडाणा : कथा-कादंबऱ्या वाचणं आम्ही केव्हाच सोडलं आहे. आता माझं बालवाङ्मय वाचण्याचं वयही राहिलेलं नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना लगावला आहे.
बुलडाणा येथे ‘भाजपच्या जिल्हा कार्यालयाचा भूमिपूजन सोहळाही फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. संजय राऊत यांचे ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे.या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत काही दावे करण्यात आले आहेत. अजून काही लिहिलं असतं, तर धमाका झाला असता. हाहाकार माजला असता असे राऊत म्हणाले होते.
यावर बोलताना फडणवीस म्हणाले, कथा-कादंबऱ्या वाचणं आम्ही केव्हाच सोडलं आहे. आता माझं बालवाङ्मय वाचण्याचं वयही राहिलेलं नाही. अशा गोष्टींवर फार गांभीर्याने विचार करण्याची गरज नाही. संजय राऊत यांच्याबाबत ते कोण आहेत? मोठे नेते आहेत का? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, महायुतीच्या माध्यमातूनच निवडणुका लढवण्यात येतील. काही अपवादात्मक ठिकाणी वेगळ्या भूमिका असतील, तरी त्या परस्पर समन्वयातून ठरवण्यात येतील. याबाबत आपण गुरूवारीच काही बाबी स्पष्ट केल्या आहेत.
पोलिसांच्या कर्जाबाबत (डीजी लोन ) मुख्यमंत्री म्हणाले, पोलिस विभागातील कर्मचाऱ्यांना डीजी कार्यालयाच्या शिफारशीनुसार मिळणाऱ्या कर्जासाठी आवश्यक परवानगी दिल्या गेल्या आहे. हा विषय मार्गी लागला आहे.
There is no age left to read children’s literature, says Chief Minister on Sanjay Raut book
महत्वाच्या बातम्या
- Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!
- Air India : एअर इंडियाने जारी केली अॅडव्हाझरी; जम्मू, लेह, जोधपूरसह सीमावर्ती भागात उड्डाणे रद्द
- Pakistans : पाकिस्तानचा कबूलनामा : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत ११ सैनिक ठार, ७८ जखमी
- Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?