विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून काही माध्यम संस्थांनी आणि सोशल मीडियावरील युजर्सनी असा दावा केला की, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने समोसा, जलेबी, लाडू यांसारख्या पारंपरिक भारतीय खाद्यपदार्थांवर आरोग्याच्या दृष्टीने गंभीर इशारा दिला आहे. या दाव्यानुसार, हे खाद्यपदार्थ हृदयविकार, मधुमेह आणि लठ्ठपणासारख्या आजारांना कारणीभूत ठरत असून, त्यावर सूचना किंवा इशारा देणारा सल्ला मंत्रालयाने जारी केला आहे.
मात्र, पीआयबी (PIB) Fact Check या केंद्र सरकारच्या अधिकृत माहिती पडताळणी यंत्रणेने हे दावे पूर्णतः खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटर/X हँडलवरून एक निवेदन जारी करत त्यांनी सांगितले की, आरोग्य मंत्रालयाने कोणत्याही अन्नपदार्थ किंवा विशिष्ट भारतीय खाद्यपदार्थ खाण्यावर इशारा दिलेला नाही. मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार सामान्यतः अति साखर, मीठ आणि तेलयुक्त अन्नपदार्थांचे मर्यादित सेवन करण्यावर भर देण्यात आला आहे. मात्र, त्यात समोसा, जलेबी, लाडू यांच्यावर बंदी, निर्बंध अथवा इशारा दिलेला नाही.
मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
काही सोशल मीडिया पोस्ट्सनी ‘ईट राईट इंडिया’ या उपक्रमातील माहितीचा संदर्भ घेत चुकीची व्याख्या करून असा गैरसमज पसरवला की पारंपरिक खाद्यपदार्थांवर कारवाई होणार आहे. प्रत्यक्षात, ‘ईट राईट इंडिया’ हा उपक्रम जनजागृतीवर आधारित आहे आणि कोणत्याही पदार्थावर बंदी लादणारा नाही. या मोहिमेचा उद्देश अन्नसुरक्षा, स्वच्छता आणि पोषण विषयक जनजागृती निर्माण करणे आहे.
PIB ने नागरिकांना विनंती केली आहे की, अशा प्रकारच्या अपप्रचारावर विश्वास ठेवू नका आणि कोणतीही माहिती फॉरवर्ड करण्यापूर्वी अधिकृत स्रोत तपासा. खोट्या बातम्यांमुळे अनावश्यक भीती आणि संभ्रम निर्माण होतो, जे समाजासाठी हानिकारक ठरू शकते.
There is no health warning from the central government on eating samosas, jalebis, laddus; ‘PIB’ exposes fake news
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या अडचणी संपेनात! सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप
- jayant patil : राजीनाम्यावर मौन सोडताना जयंत पाटील यांचे भाजप प्रवेशावर भाष्य
- Kaustubh Dhavase : मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
- Shiv Sena dispute : शिवसेनेतील वादावर तीन महिन्यात निकाल, पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हाचा होणार फैसला