विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारत सहन करणार नाही, आणि योग्य वेळी योग्य उत्तर देईल” हे पुन्हा एकदा भारतीय सैन्याने सिद्ध केल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वी कारवाईबद्दल त्यांनी भारतीय सैन्यदलाचे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. यावेळी पुरावा मागायला जागा नाही, असे म्हणत त्यांनी विरोधकांनी पूर्वीच्या कामगिरीवर व्यक्त केलेल्या शंकांना उत्तर दिले.
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतीय लष्कराने मंगळवारी मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानमधील ७ शहरांमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ या नावाने राबवण्यात आलेल्या या मोहिमेने संपूर्ण देशात आनंदाची लाट निर्माण झाली आहे.
या कारवाईनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “भारतावर झालेला प्रहार भारत सहन करत नाही, हे पुन्हा सिद्ध झाले आहे. ऑपरेशन सिंदूर हे केवळ एक लष्करी कारवाई नव्हे, तर संपूर्ण राष्ट्राच्या शौर्य आणि आत्मसन्मानाचे प्रतीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय लष्कराने घेतलेले हे पाऊल प्रत्येक भारतीयाच्या मनात गर्वाची भावना निर्माण करणारे आहे.”
पुलवामा हल्ल्यानंतर झालेल्या एअर स्ट्राईकवेळी काही विरोधकांनी पुराव्याची मागणी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री म्हणाले, यावेळी कुणालाही पुराव्याची मागणी करायला जागा उरलेली नाही. जे घडलं आहे ते संपूर्ण जगाने पाहिलं आहे.
There is no place to ask for evidence, Chief Minister hits out at the opposition over Operation Sindoor
महत्वाच्या बातम्या
- Operation sindoor वर मोदींचे मॉनिटरिंग; जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा, हिजबुल यांच्या म्होरक्यांना मारण्यासाठीच पाकिस्तानात 9 ठिकाणांवर भारताचे मिसाईल हल्ले!!
- Operation sindoor : पाकिस्तानात 3 ठिकाणी 9 टार्गेटवर भारताचा क्षेपणास्त्र हल्ला; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा घेतला बदला!!
- Devendra Fadnavis : अहिल्यादेवी यांचे जन्मगाव चौंडीचा तीर्थस्थळ म्हणून विकास करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
- Mahadev Jankar : भाजपने विचारले नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली, महादेव जानकारांची खंत