विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : आज 21व्या शतकात जेव्हा मुली आणि सूनांमध्ये कोणताही फरक करणं चुकीचं आहे. सुनेला अशा प्रकारची वागणूक देणे हे अतिशय पाप आहे. ते या ठिकाणी झालं आहे. सध्या याप्रकरणी कसून चौकशी सुरु आहे, असा संताप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर बोलताना केला.
पिंपरीतील 23 वर्षीय विवाहिता वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी आधी पती शशांक, सासू लता आणि नणंदेला अटक करण्यात आली होती. दरम्यान सात दिवसांपासून फरार असलेले सासरे राजेंद्र आणि दीर सुशील यांना शुक्रवारी पहाटे पोलिसांनी अटक केली.
मुख्यमंत्री म्हणाले, “या प्रकरणातील आरोपींना शुक्रवारी पहाटे अटक झाली आहे. पोलिसांनी पुराव्यांच्या आधारे योग्य कारवाई केली आहे. एखाद्या मुलीला छळ करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणं सहन होण्याजोगं नाही. आम्ही कायदेशीर मर्यादेत राहून जे काही करता येईल, ते नक्की करू.”
मकोका कायद्या संदर्भात विचारले असता फडणवीस म्हणाले, “मकोका लावण्यासाठी ठराविक अटी असतात. त्या अटींमध्ये हे प्रकरण बसतं का, याचा तपास करावा लागेल. त्यामुळे आत्ताच मकोका लागू होईल का, हे सांगणं शक्य नाही.”
अजित पवार यांच्या भूमिकेबाबत विचारल्यावर मुख्यमंत्री म्हणाले, “अजित पवार यांचं या प्रकरणाकडे दुर्लक्ष असल्याचं मी मानत नाही. लग्न कार्यात कार्यकर्ते बोलावतात म्हणून आपण जातो, पुढे काय घडेल याची कल्पना नसते. हेच त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. सध्या पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचे राजकारण होऊ नये आणि विविध दिशांनी फाटे फोडू नयेत, यासाठी संयम पाळावा, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
Torture of daughter-in-law is a sin, it happened here, Chief Minister Devendra Fadnavis is angry over the suicide case of Vaishnavi Hagawane
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर