विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपचा अहंकाराचा फुगा फोडायचा आणि मुंबईत विजयाचा गुलाल उधळायचा आहे असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. Uddhav Thackeray
प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ठाकरे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने लोकशाहीची वाट लावली आहे. राज्यात आणि देशात विरोधीपक्षच ठेवायचा नाही, असे त्यांनी ठरवले आहे. मात्र त्यांना मुंबई कधीही जिंकू देणार नाही. ज्या प्रमाणे झांशीची राणी म्हणत होती की, मै मेरी झांसी नहीं दुंगी, तसेच आता मुंबई आम्ही देणार नाही. ही शपथ आपल्याला घ्यायची आहे.
माझी मुंबई तुम्हाला लुटू देणार नाही, हे सांगण्याची वेळ आली आहे. त्यांना सर्वच जिंकायचे आहे. को-ऑपरेटीव्हची निवडणूक त्यांनाच जिंकायची आहे. त्यांचा हा अहंकाराचा फुगा आपल्याला फोडायचा आहे आणि मुंबईत विजयाचा गुलाल उधळायचा आहे.
भाजप सत्तेत आल्यापासून मुंबई महापालिकेच्या ठेवी मोडत असल्याचे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही कोणत्याही परिस्थितीत मुंबई जिंकणारच. 25 वर्षांत शिवसेनेने जे काम केले, तेवढा आपलेपणा एका तरी भाजपच्या नेत्यांमध्ये आहे का? आम्ही 92 हजार कोटींच्या ठेवी जमवून दाखवल्या होत्या. भाजप सत्तेत आल्यापासून या ठेवी तोडल्या जात आहेत.
दोन लाख तीस हजार कोटींची देणी यांनी करुन ठेवली आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे पहिल्या पाचात होते. त्यांच्या घरात माझा जन्म झाला आहे. माझ्या डोळ्यासमोर हे मुंबईचे लचके तोडतील आणि मी फक्त पाहात बसणार आहे का? यांची पूर्ण लंकाच आता मशालीने जाळायची आहे.
Uddhav Thackeray Fires First Shot for Local Body Polls, Says BJP’s Ego Must Burst
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : प्रो बैलगाडा लीग सुरू करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घाेषणा
- Sharad Pawar : काॅंग्रेसला ठाकऱ्यांचा नकाे हात, शरद पवारांची घेणार साथ
- संविधानिक संस्थांवर काँग्रेसच्या हल्ल्यांचा निषेध, २७२ माजी अधिकारी व न्यायमूर्तींचे खुले पत्र
- सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयावर महापालिका – जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य, नाेटिफिकेशन काढण्यासाठी थांबण्याचे न्यायालयाचे निर्देश



















