विशेष प्रतिनिधी
मुंबई: मुंबईहून कणकवली येथे जात असताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या घातपाताचा प्लॅन केला होता असा खळबळजनक आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला आहे.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कदम (Ramdas Kadam) म्हणाले, आम्ही कणकवलीला चाललो होतो. त्यावेळेला आम्हाला पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तुम्ही रस्ता बदला. राज ठाकरे यांच्या घातपाताचा प्लॅन होता. माझ्या आणि राज साहेबांच्या माहितीप्रमाणे तो प्लॅन उद्धव ठाकरे यांनीच केला होता. तुम्ही हा विषय एकदा राज ठाकरे यांना विचारून घ्या. आम्हाला कणकवलीला रस्ता बदलून वेगळ्या रस्त्याने कणकवलीला जायला लागले होते. कणकवलीच्या पोलीस अधीक्षकांनी तेथे थांबून दिले नाही. परत जायला सांगितले.
राज ठाकरे यांना राजकारणातून पूर्णपणे संपवण्याचा कार्यक्रम सुरू होता असा आरोप करून कदम म्हणाले, राज ठाकरे यांनी काय मागितलं होतं? सांगा त्यावेळेला फक्त दोन जिल्हे एक पुणे आणि एक नाशिक हे दोन जिल्हे मला द्या. बाकी पक्ष सगळा तुम्ही सांभाळा अशी राज ठाकरे यांची भूमिका होती. उद्धव ठाकरे नाही म्हटला. तेव्हा महाराष्ट्र कुठे गेला होता? तेव्हा उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचा मराठी माणसाचा हित कळले नाही का? एखाद्या राक्षसाचा जीव हा पोपटात असतो तसा उद्धव ठाकरे यांचा जीव मुंबई महानगरपालिकेत आहे. मुंबई महानगरपालिका हवी म्हणून राज ठाकरे यांना वापरून घेईल महाराष्ट्रासाठी उद्धव ठाकरे काँग्रेसला सोडणार आहे का याचे उत्तर अजून मिळाले नाही. निवडणुका जवळ आल्या की मुंबई गुजरातला जोडणार .इकडून सगळे गुजरात नेण्याचा प्लॅन अशी बतावणी उध्दव ठाकरे करतात.
कदम म्हणाले, मी राज ठाकरे यांचा फॅन आहे. अगदी मनापासून सांगतो मी खूप त्या माणसावरती मनापासून प्रेम करतो. उद्धव ठाकरेला बरोबर घेतल्यानंतर महाराष्ट्राचे भलं तुम्ही काय करणार आहात ते एकदा राज ठाकरे साहेब तुमच्या जवळचा मित्र म्हणून तुम्हाला विचारतो. तुमचा चाहता म्हणून जवळचा तुम्हाला विचारतो. आज उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा घेऊन राज ठाकरे यांच्या मागे या या असं पडला आहे.
Uddhav Thackeray had planned Raj Thackeray’s assassination, alleges Ramdas Kadam
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी