विशेष प्रतिनिधी
मुंबई : गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेले या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे भाजपची अवस्था झाली आहे. आम्ही परंपरेचे पाईक आहोत, पण या ब्रह्मचर्य पाळणाऱ्यांना चाळीस पिलावळं कशी झाली, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. Uddhav Thackeray
मुंबई वरळी डोम येथे शिवसेना निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले, आजचा योगायोग म्हणजे सामनामध्ये दोन जागा पाहिल्या. भाजप कार्यालयाचे उद्घाटन आणि जिजामाता उद्यानामध्ये पेंग्विन येणार. पण पेंग्विन आणल्यावर त्या बुद्धीचे लोक इथे आपल्यावर टीका करतात ते वेगळंच. आज अॅनाकोंडा मुंबईत येऊन गेला. उद्घाटन करा पण हा घराणेशाहीवर टीका करतो. Uddhav Thackeray
गोळ्या घालण्याचा आदेश देणारा व्यक्ती मोरारजी देसाई हा देखील एक गुजरातीच होता. गोळ्या घालून मराठी माणूस झुकत नाही, म्हणून पैसे देवून मुंबई ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला आश्चर्य वाटते की या अशा पिलावळीला आपण का वाढवले. चहावाला पंतप्रधान झाला म्हणून त्याला पाठिंबा दिला होता. पण चहावर जीएसटी लावणारा हा कसा पंतप्रधान आहे, असा सवाल ठाकरे यांनी केला.
देशप्रेमी म्हणणारी ही बोगस देशप्रेमी टोळी आहे. आत्मनिर्भर भारत अभियान ही लोक राबवत आहेत. पण यांच्याकडे आत्मनिर्भर भाजप नाही. यांच्याकडे आयात केलेली पिलावळ आहे. मर्दाची औलाद आहेत तर समोर या. अन्यथा नार्मदाची औलाद असेल तर पक्ष फोडून या. त्यांच्यावरील संशय अजूनही गेलेला नाही. ईव्हीएमवरील संशय अजूनही गेलेला नाही. बोगस मतदार करून निघून जाणार आणि मतमोजणीतही तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे निकाल देणार तर मग निवडणूक आयुक्तांवरही गु्न्हा दाखल करायला हवा. कारण कायद्यात सर्वजण सारखेच आहेत. निवडणूक आयुक्त कायद्यात कचाट्यात सापडला तर त्यांनाही सजा व्हायलाच हवी.
आता निवडणुकीच्या तोंडावर हिंदू-मुस्लीम असा वाद निर्माण करतील. कुणीतरी नमाज पठण केले म्हणून एखादी अपवित्र झालेली जागा हे शेणाने सारवून पवित्र करत असाल गोमुत्र शिंपडत असाल तर ही गोमुत्रधारी बेगडी प्रजात आहे, असा आरोप करत उद्धव ठाकरे म्हणाले, दीपोत्सवाच्या प्रकाशात त्यांचा आनंद अधिक उजळून निघाला होता. पण गेल्या निवडणुकीत त्यांनी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याचा अपप्रचार केला. आधी जर कळले असते तर या रोषणाईची धग तुमच्या बुडालाही लावली असती, असा इशारा ठाकरे यांनी दिला.
Uddhav Thackeray Mocks BJP: “They Lost Both the Donkey and Their Celibacy”
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















