अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनच्या जागी वंदे भारत?पीआयबीने दिले स्पष्टीकरण

अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनच्या जागी वंदे भारत?पीआयबीने दिले स्पष्टीकरण

विशेष प्रतिनिधी

अहमदाबाद ते मुंबई दरम्यान प्रस्तावित असलेली जपानी बुलेट ट्रेन रद्द केल्याची अफवा सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. काही माध्यमांनी असेही वृत्त दिले की, ‘वंदे भारत’ ट्रेन बुलेट ट्रेनच्या जागी सुरू केली जाणार आहे. मात्र, या दाव्यांवर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) शिक्कामोर्तब करत स्पष्ट केलं आहे की हे सर्व दावे ‘भ्रामक आणि तथ्यहीन’ आहेत.

काही मीडिया संस्थांनी दावा केला होता की, जपानने बुलेट ट्रेनच्या दरात मोठी वाढ केल्यामुळे भारत सरकारने हा प्रकल्प मागे घेतला आहे. ‘हिंदुस्तान’ या वेबसाईटवरील एका अहवालानुसार, एका बुलेट ट्रेनसाठी आधी १६ कोटी रुपयांचा खर्च ठरवला होता, तो आता ५० कोटींपर्यंत गेला आहे. त्यामुळे भारत सरकारने हा व्यवहार रद्द केला, असे त्या वृत्तात म्हटले होते.

PIB ने आपल्या अधिकृत फॅक्ट-चेकमध्ये या दाव्यांचा खंडन करत म्हटले की, रेल्वे मंत्रालयाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. उलट, अहमदाबाद-मुंबई हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प (HSR) संपूर्ण गतीने सुरू आहे आणि जपानसोबतचा धोरणात्मक सहकार्याचा भाग म्हणून हा प्रकल्प प्राधान्याने राबवला जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती

अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाची एकूण लांबी ५०८ किमी असून, यात जपानी शिंकानसेन (Shinkansen) तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. भारत-जपान दरम्यान झालेल्या करारानुसार, जपान सरकार अत्याधुनिक E10 Shinkansen गाड्या पुरवणार आहे. सध्या ३१० किमी लांबीचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) ते ठाणे दरम्यानचा २१ किमी लांबीचा भुयारी बोगदा, जो आता पूर्ण झाला आहे. यामुळे मुंबई शहरातील बुलेट ट्रेनच्या प्रवेशद्वाराचे काम पुढे सरकले आहे.

PIB च्या प्रेस नोटमध्ये हेही नमूद करण्यात आले की, जपानी सरकारने भारतासोबत असलेल्या करारावर पूर्ण विश्वास ठेवला असून, त्यांनी बुलेट ट्रेन गाड्या पुरवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे या प्रकल्पात कोणताही व्यत्यय नाही.

सोशल मीडियावर फिरणारे दावे की, “बुलेट ट्रेन रद्द झाली आहे”, किंवा “वंदे भारतने तिची जागा घेतली”, हे संपूर्णपणे खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत. केंद्र सरकार, रेल्वे मंत्रालय आणि जपानी भागीदार यांच्यातील सहकार्याअंतर्गत हा प्रकल्प जलदगतीने पूर्णत्वाकडे जात आहे, असे सांगण्यात आले आहे.

Vande Bharat instead of Ahmedabad-Mumbai bullet train? PIB gives clarification

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023