बच्चू कडू यांना काळे फासणाऱ्यास दोन लाख रुपयांचे बक्षीस, विखे समर्थकांचा पलटवार

बच्चू कडू यांना काळे फासणाऱ्यास दोन लाख रुपयांचे बक्षीस, विखे समर्थकांचा पलटवार

विशेष प्रतिनिधी

कर्जतः प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी जलसंपदा तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केल्यानंतर, आता विखे समर्थकही आक्रमक झाले आहेत. या घोषणेला प्रत्युत्तर म्हणून भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब सोनमाळी यांनी “बच्चू कडू यांना काळे फासणाऱ्यास दोन लाख रुपयांचे बक्षीस” जाहीर करून राजकीय वातावरण आणखी तापवले आहे.  Bachchu Kadu

काही दिवसांपूर्वी झालेल्या सभेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या एका विधानावरून बच्चू कडू यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली होती. विखे पाटील यांनी आपल्या भाषणात म्हटले होते की, “कर्ज काढून निवडणुका लढवू नका, कारण ते पैसे वाया जातात आणि शेवटी पुन्हा कर्जमाफीची मागणी करावी लागते.” हे वक्तव्य शेतकऱ्यांना उद्देशून केले असल्याचे विखे समर्थकांचे म्हणणे आहे, परंतु बच्चू कडू यांनी याचा विपर्यास करून ते शेतकऱ्यांचा अपमान करणारे वक्तव्य असल्याचे सांगत विखे यांच्यावर थेट हल्ला चढवला. Bachchu Kadu



कडू यांनी त्यावर “विखे यांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस” अशी घोषणा केली. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड संताप व्यक्त झाला.

त्याला प्रत्युत्तर म्हणून शनिवारी पत्रकार परिषद घेऊन भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब सोनमाळी यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका करत म्हटले, “विखे कुटुंब गेली तीन पिढ्यांपासून समाजकारणात कार्यरत आहे. त्यांनी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी कर्जयोजना राबवली. जिल्हा बँक, खत वितरण व्यवस्था आणि अतिवृष्टी काळात मदत या सगळ्या क्षेत्रांत त्यांनी शेतकऱ्यांचे काम केले. अशा व्यक्तीवर घाणेरडे आरोप करणे हा शेतकऱ्यांचाच अपमान आहे.”

बच्चू कडू यांनी चुकीचा अर्थ लावून जनतेत भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ते जिल्ह्यात आले, तर त्यांना काळे फासणाऱ्यास आम्ही दोन लाख रुपयांचे बक्षीस देऊ. अहमदनगरच्या भूमीवर अशा बेताल वक्तव्य करणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

सोनमाळी म्हणाले, “मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण आंदोलनावेळी विखे यांनी संवेदनशीलतेने परिस्थिती हाताळली. मात्र, बच्चू कडू यांनी त्या आंदोलनाचा गैरफायदा घेऊन राजकीय मुद्दा बनवण्याचा प्रयत्न केला, जो फसला.”

या संपूर्ण वादावरून आता राजकीय संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे. एकीकडे कडू शेतकऱ्यांच्या नावावरून विखे यांच्यावर निशाणा साधत आहेत, तर दुसरीकडे विखे समर्थकांचा दावा आहे की, “कडू यांचा हेतू फक्त प्रसिद्धी मिळवणे आहे.”

Vikhe Supporters Hit Back: ₹2 Lakh Reward Announced for Anyone Who Smears Black Ink on Bachchu Kadu

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023