विशेष प्रतिनिधी
बीड : खंडणी उकळण्यामध्ये संतोष देशमुख अडथळा ठरत होते. म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. वाल्मिक कराडच मास्टरमाइंड असल्याचे सीआयडीने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे.
राज्य सरकारने या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडी आणि एसआयटीची स्थापना केली होती. आता सीआयडीने 1800 पानी आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात आठ जणांवर मकोका कायद्यातंर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाल्मिक कराडसह इतर आरोपींचा या गुन्ह्यामध्ये जो सहभाग आहे, तो सुद्धा मांडण्यात आला आहे.
सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या तिघांमध्ये हत्येच्या दिवशी आणि त्याआधी जे संभाषण झालं, नेमकं काय बोलणं झालं, संतोश देशमुख यांची हत्या कशी झाली? त्याची माहिती सीआयडीच्या आरोपपत्रातून देण्यात आली आहे.
संतोष देशमुख यांना मारहाण करताने जे व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं ते सीआयडीच्या हाती लागले . देशमुखांना मारहाण करताना आरोपी दिसतायत, ते पुरावे सीआयडीने आरोपपत्रात जोडले आहेत. वाल्मिक कराडला अवादा कंपनीकडून 2 कोटी रुपये खंडणी उकळायची होती. पण त्यामध्ये संतोष देशमुख अडथळा ठरत होते. म्हणून वाल्मिक कराडने हत्येच कारस्थान रचले. हत्येमागच हेच कारण आहे.
Walmik Karad mastermind in Santosh Deshmukh murder case, CID claims in charge sheet
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…