विशेष प्रतिनिधी
महाबळेश्वर : Ramdas Athawale मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एखादी बैठक घ्यावी आणि फडणवीस यांच्यावरील टीका टाळावी, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.Ramdas Athawale
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या सक्षमीकरणासाठी महाबळेश्वर येथे राज्यस्तरीय विचार मंथन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानात 29 ऑगस्टपासून आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. महाबळेश्वर येथे झालेल्या राज्यस्तरीय विचारमंथन शिबिरात मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत एकमताने हा पाठिंब्याचा ठराव मंजूर करण्यात आला.Ramdas Athawale
या शिबिरात बोलताना आठवले म्हणाले, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याची भूमिका आधीपासून आहे. मनोज जरांगे यांची मागणी आहे की सर्व मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या. सर्व मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणे शक्य नाही. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको, अशी आमची भूमिका आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या माध्यमातून सरकार उलथवून लावेल, असा इशारा दिला होता. त्यावर अनेकांनी टीका देखील केली होती. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील सरकार उलथवून टाकायला मनोज जरांगे यांच्याकडे किती आमदारांचा पाठिंबा आहे? असा सवाल केला होता. या पार्श्वभूमीवर चार सत्ताधारी आमदारांनी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, त्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके, विजयसिंह पंडित, आमदार राजू नवघरे आणि शिवसेना शिंदे गटाचे विलास भुमरे या आमदारांचा समावेश आहे. विरोधी पक्षातील तीन खासदार आणि दोन आमदारांचा पाठिंबा आहे. यात शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील तर शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पाठिंबा दिला आहे.
We support Jarange but avoid criticizing Devendra Fadnavis, advises Ramdas Athawale
महत्वाच्या बातम्या
- Arun Gawli : शिवसेना नगरसेवक हत्या प्रकरण : वयाचा विचार करून डाॅन अरुण गवळीला जामीन
- Jayashree Shelke : संजय गायकवाडांसमाेरील अडचणीत वाढ : केवळ ८४१ मतांनी पराभूत झालेल्या जयश्री शेळके यांची फेरमाेजणीची मागणी
- Harshvardhan Sapkal : राजधर्माचे पालन करा आणि मराठा आरक्षणाची घोषणा करा, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
- Devendra Fadnavis : ओबीसीतून आरक्षण मराठा समाजाच्या हिताचे नाही, मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका