आरक्षण काढून घेण्याची भाषा करणाऱ्यांना आम्ही टक्क्यातही ठेवणार नाही, धनंजय मुंडे यांचा इशारा

आरक्षण काढून घेण्याची भाषा करणाऱ्यांना आम्ही टक्क्यातही ठेवणार नाही, धनंजय मुंडे यांचा इशारा

Dhananjay Munde

विशेष प्रतिनिधी

पाथर्डी : वंजारी समाजाच 2 टक्के आरक्षण काढून घेण्याची भाषा करणाऱ्यांना आम्ही टक्क्यातही ठेवणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे  यांनी मराठा आंदोलक मनोज जरांग यांना दिला आहे. या इशाऱ्यामुळे मराठा आरक्षणामुळे निर्माण झालेला वाद अधिकच चिघळण्याची भीती निर्माण झाली आहे. Dhananjay Munde

अहिल्यानगरच्या पाथर्डी – शेवगाव येथ वंजारी समाजाला अनुसूचित जमातीच (एसटी) आरक्षण देण्याच्या मागणीसाठी काही तरुणांनी उपोषण सुरू केले होते. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच नेते प्रतापराव ढाकणे यांनी या तरुणांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली. यावेळी तरुणांनी धनंजय मुंड यांच्याशी बोलणे करून देण्याचा आग्रह धरला. त्यावर ढाकणे यांनी थेट धनंजय मुंड े यांना फोन लावला. त्यानंतर मुंड यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधून मनोज जरांगे यांना आमचे दोन टक्के काढून घेण्याची वल्गना करणाऱ्यांना टक्क्याही ठेवणार नाही असा इशारा दिला.

धनंजय मुंडे म्हणाले, हैदराबाद गॅझेटियर समोर आले नसते, तर आपण वंजारी समाज केवळ पाथर्डीमध्येच नाही तर, बऱ्याच ठिकाणी, इतर राज्यांतही एसटीएमध्य आहोत. आता हैदराबाद गॅझेटियरनुसार इतर कुणाला फायदा मिळत असेल, तर आम्हालाही एसटीचा फायदा मिळाला पाहिजे. गॅझेटियरमधील एकेका शब्दाचा कुणाला फायदा होत असेल, तर तो आम्हाला देखील झाला पाहिजे. कारण, आपले 2 टक्क्यांमध्ये बरे चालले होते. पण आता काहीजण हे दोन टक्के काढण्याची भाषा करत आहेत. जे लोक अशी भाषा करत आहेत, त्यांना सांगतो आम्ही तुम्हाला टक्क्यातही ठेवणार नाही. आता आम्हाला अनुसूचित जमातीमध्येच आरक्षण हवे आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.

मुंडे यांनी यावेळी सरकार आपल्या पाठिशी असल्याची ग्वाही देत उपोषणकर्त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. सरकार आपल्यासोबत आहे. ते आपले काहीही नुकसान करणार नाही. सरकारवर विश्वास ठेवा. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटील यांनीही पाथर्डीत येऊन तुम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणण्याचा शब्द दिला आहे. त्यांचा व सरकारचा मान ठेवून आपले उपोषण स्थगित करा, असे ते म्हणाले.

We will not spare even a cent for those who talk about removing reservations, warns Dhananjay Munde

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023