विशेष प्रतिनिधी
मुंबई : लक्ष्मण हाके हे केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी उथळ वक्तव्य करत आहेत. ते दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढील आठ दिवसांत त्यांना धडा शिवला नाही, तर आमचं नाव सुरज चव्हाण नाही. त्यांची अवस्था भटक्या कुत्र्यासारखी करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दिला आहे. Laxman Hake
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी अत्यंत कठोर आणि संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. चव्हाण म्हणाले की, “हाके यांना महाराष्ट्रात मोकळं फिरू देणार नाही. त्यांना योग्य जागा दाखवण्याची जबाबदारी आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आहे. पुढच्या दहा दिवसांत त्यांनी जर खुलेआम फिरण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही त्यांना थांबवू. भटक्या कुत्र्यांशी कसं वागायचं, हे आम्हाला चांगलंच ठाऊक आहे.”
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप केला होता की, त्यांच्या अर्थ खात्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. मराठा समाजासाठी कार्य करणाऱ्या सारथी संस्थेला निधी दिला जातो, पण महाज्योतीला दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही, असा आरोप हाकेंनी केला होता.
राज्यातील ओबीसी समाजामध्ये शिक्षणाच्या संधींबाबत असलेल्या असंतोषाची पार्श्वभूमी लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्यामागे आहे. त्यांनी सातत्याने सरकारकडे मागणी केली आहे की, ओबीसी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्यासाठी निधीच्या बाबतीत भेदभाव होऊ नये.
We will treat you like a stray dog, NCP Ajit Pawar group warns Laxman Hake
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी