विशेष प्रतिनिधि
भंडारा : राज्यात नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री नेमकं कोण होणार यावरून गेले काही महीने सतत चर्चा चालू आहेत. दहा महीने झाले तरी अद्यापही नाशिक आणि रायगडला पालकमंत्री मिळत नसल्याने राजकीय वातावरण बरेच तापलेले आहे. अशातच महायुती सरकारने मात्र भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले आहे. Pankaj Bhoyar
महायुती सरकारने भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मात्र, सोमवारी रात्री अचानक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्यात आल्याचा शासनाचा आदेश आला. गृहराज्यमंत्री पंकज भोयर हे आता भंडारा जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री असतील. तर संजय सावकारे यांच्याकडे बुलढाणा जिल्ह्याच्या सहपालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
भंडाऱ्याचे पालकमंत्री बदलल्याचा शासन आदेश सोमवारी रात्री राज्याचे उपसचिव दिलीप देशपांडे यांनी काढला आहे. या निर्णयामागे भंडाऱ्यात संजय सावकारे यांच्याबद्दल असलेली तीव्र नाराजी कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. संजय सावकारे हे भंडाऱ्याचे पालकमंत्री असले तरी ते फक्त 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, जिल्हा नियोजनाच्या आढावा बैठक याव्यतिरिक्त जिल्ह्यात फारसे फिरकत नव्हते. या सगळ्यामुळे भंडाऱ्यातील नागरिकांकडून आम्हाला स्थनिक पालकमंत्री हवा, अशी मागणी केली जात होती. त्यामुळे संजय सावकारे यांच्याजागी पंकज भोयर यांना भंडाऱ्याचे पालकमंत्री म्हणून नेमण्यात आले असावे, असा अंदाज आहे. पंकज भोयर हे लगतच्या वर्धा जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने पंकज भोयर यांच्यावर भंडाऱ्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिल्याचं बोललं जात आहे. Pankaj Bhoyar
पंकज भोयर आहेत कोण?
भोयर यांनी अर्थशास्त्र या विषयात त्यांचे शिक्षण घेतलेले आहे. तसेच त्यांनी पी.एच.डी देखील केलेली आहे. त्यांचे वर्धा जिल्ह्यात विविध शिक्षण संस्थांचे जाळे देखील आहे.
पंकज भोयर यांनी २०१४ मध्ये कॉँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी भाजपाच्या तिकीटावारच २०१४ सालची वर्धा विधानसभा लढवली आणि ते आमदार म्हणून विजयी देखील झाले होते. २०१४ नंतर २०१९ व २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांना विजय मिळाला. यामुळे त्यांनी वर्धा विधानसभा मतदारसंघात आपलं वर्चस्व निर्माण केलं. केवळ इतकंच नाही तर सलग तीनदा कॉँग्रेसचा पराभव केल्यामुळे पंकज भोयर यांची ओळख वर्धा जिल्ह्यातून कॉंग्रेस हद्दपार करणारा नेता अशी तयार झाली.
त्यामुळे आगामी निवडणूका लक्षात घेऊनच भोयर यांच्यावर भंडाऱ्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली असल्याच्या चर्चांनी आता चांगलाच जोर धरला आहे. Pankaj Bhoyar
What does the history of Bhandara’s new Guardian Minister Pankaj Bhoyar tell us?
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला