विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Raut सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे याचे नाव देखील चांगलेच चर्चेत असते. मात्र शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ‘श्रीकांत शिंदे यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाहीये. त्याला उद्धव ठाकरेंनी खासदार केले आहे,’ असे वक्तव्य केले.
‘श्रीकांत शिंदे यांचा शिवसेनेशी काय संबंध आहे? उद्धव ठाकरेंनी त्याला खासदार केले आहे. हे पोरगं त्याआधी कधी शिवसेनेमध्ये होते का? एकनाथ शिंदे हे स्वतःच उद्धव ठाकरेंकडे आले होते आणि माझ्या मुलाला काही काम नाही, तो हाडांचा डॉ. आहे, असे म्हणत त्याला तिकीट द्या असे म्हटले होते. तेव्हा गोपाळ लांडगे यांचे तिकीट नाकारत श्रीकांत शिंदे यांना त्यांच्या जागी तिकीट देण्यात आल्याचा’ धक्कादायक खुलासा, संजय राऊत यांनी केला आहे. Sanjay Raut
यासोबतच संजय राऊत यांनी राजन विचारे यांनी त्यांच्यासाठी केलेल्या त्यागाची देखील त्यांना आठवण लकरून दिली. राऊत म्हटले की, ‘राजन विचारे यांनी केलेल्या त्यागामुळे आज एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात आले आहेत. त्यामुळे त्यांनी रोज विचारे यांचे पाय धुतले पाहिजे. कारण विचारे सभागृह नेता असताना शिंदेच्या घरी दुर्घटना घडली होती व ते त्या दुःखात होते. त्यामुळे राजन यांनी प्रस्ताव ठेवत प्रस्ताव ठेवत शिंदे यांना सभागृह नेता केला.’
पुढे शिंदे यांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर संजय राऊत म्हणाले की, ‘एकनाथ शिंदे यांना घेरण्याची गरज नाही. ते काही योद्धा नाहीत, ते डरपोक आहेत. ते आपल्या कर्माने मरतील. ठाण्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी भगवा झेंडा लावला, एकनाथ शिंदेंनी नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या फोटो इतका फोटो लावण्याचा अधिकार त्यांना नाही. बाळासाहेब ठाकरेंचे नेतृत्व खूज करण्यासाठी भाजपचे हे प्रयल्न सुरू आहेत.’ Sanjay Raut
आनंद दिघे यांच्याविषयी विचारले असता, संजय राऊत म्हणाले की, ‘आनंद दिघे यांनी कधीच असे म्हटले नाही की संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीमुळे मला ताडा लागला. आम्ही त्यांना कारागृहात भेटण्यासाठीही जात होतो. कारागृहातून सुटल्यानंतर ते माझ्या घरी देखील येऊन गेले होते. त्याच अटकेने ते जनतेसाठी धर्मवीर झाले होते. मात्र या पोरांना अजून राजकारण कळत नाही.’
तसेच ‘ज्या दिघेंच्या आनंद आश्रमात ही लोक बसत आहेत, तो कुणी कुणाच्या नावावर करुन घेतला आहे. ती मालमत्ता कुणी कुणाच्या नावावर करुन घेतली?’ असा खोचक सवाल देखील राऊत यांनी यावेळी केला. Sanjay Raut
What is the connection between Shrikant Shinde, who was made an MP by Uddhav Thackeray, and Shiv Sena?; Sanjay Raut
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!