विशेष प्रतिनिधी
मुंबई : पहलगाम हल्ला आणि त्यानंतर झालेल्या भारत पाकिस्तान सामन्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच एक नवं व्यंगचित्र शेअर केलं आहे. या व्यंगचित्रांच्या माध्यमातून त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. नक्की कोण जिंकलं आणि कोण हरलं? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. Raj Thackeray
राज ठाकरेंच्या या व्यंगचित्रात पहलगामधील हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले नागरिक दाखवण्यात आले आहेत. याबरोबरच गृहमंत्री अमित शहा तसेच आययीसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनाही दाखवण्यात आलं आहे. या व्यंगचित्रात जय शहा ‘अरे बाबांनो उठा आपण जिंकलो पाकिस्तान हरले’ असं म्हणत आहेत. तर नक्की कोण जिंकलं आणि कोण हरलं? असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला आहे.
राज ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर हे व्यंगचित्र शेअर केलं आहे. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चाही सुरु झाल्या आहेत. यावरून आता राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
#पहलगाम #काश्मीर #PahalgamAttack #BCCI #ICC #AsiaCup #INDvsPAK#Cricket pic.twitter.com/ASx9fpB81Y
— Raj Thackeray (@RajThackeray) September 17, 2025
Who exactly won and who lost? Raj Thackeray’s rebuke on India-Pakistan match
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!