Uddhav Thackeray : एवढे दिवस नैतिकतेच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडेंचा राजीनामा का नाही घेतला? उद्धव ठाकरे यांचा अजित पवारांना सवाल

Uddhav Thackeray : एवढे दिवस नैतिकतेच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडेंचा राजीनामा का नाही घेतला? उद्धव ठाकरे यांचा अजित पवारांना सवाल

Uddhav Thackeray

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Uddhav Thackeray नैतिकतेच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला असेल तर एवढे दिवस त्यांचा राजीनामा का नाही घेतला? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे  ( Uddhav Thackeray ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar )  गटाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला आहे.Uddhav Thackeray

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. यानंतर अखेरीस मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असून त्यांचा हा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांकडून स्वीकारण्यात आला आहे. पण मुंडेंच्या राजीनाम्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सवाल केला आहे. ते म्हणाले की, धनंजय मुंडे यांच्यावर जे काय बोलायचे होते ते सगळ्या माझ्या आमदारांनी बोलले आहे. आता हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे तो की जे काही व्हिडीओ किंवा फोटो आले आहेत ते आधी सरकारकडे आले होते की नव्हते? आता फक्त धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला आहे. अजून पुढे अनेक गोष्टी येतील. मुख्यमंत्री जर पारदर्शी कारभार करत असेल तर त्यांचे स्वागत आहे. पण पारदर्शीपणाने कारभार करताना त्यांचे हात कोणी बांधत आहेत का? असा

उद्धव ठाकरे म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी तब्येतीचे कारण देत राजीनामा दिला आहे. अजित पवार म्हणतात की नैतिकतेच्या मुद्द्यावरून त्यांनी राजीनामा दिला. नैतिकतेचा मुद्दा असेल तर एवढे दिवस त्यांचा राजीनामा का घेतला नाही? मुंडेंनी तब्येतीचे कारण सांगितले असेल आणि आता जर एवढे व्हिडीओ आणि फोटो समोर आले असतील तरीही त्या गोष्टीवरून त्यांचा राजीनामा का घेतला नाही हे स्पष्ट करावे,

यावेळी उद्धव ठाकरे यांनी विधानसभेतील विरोधी पक्षासाठी भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस केल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे विरोधी पक्षनेते पदासाठी भास्करराव जाधव यांच्या नावाची मागणी केलेली आहे. आम्हाला खात्री आहे ही लोकशाही मूल्यांचा पालन करून लवकरात लवकर यावर निर्णय होईल. बजेटपूर्वी विरोधी पक्ष नेतेपद दिले जाईल. ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून तशा आशयाचे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना देण्यात आले आहे.

Why didn’t Dhananjay Munde resign on the issue of ethics for so long? Uddhav Thackeray’s question to Ajit Pawar

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023