विशेष प्रतिनिधी
पुणे : Ambadas Danve उपमुख्यमंत्री अजित पवार हे शेतकऱ्यांना नेहमीच फुकट लागतं असं म्हणतात. पण त्यांच्या मुलाला देताना 1800 कोटींची जमीन फक्त 300 कोटी रुपयांत कशी दिली जाते. या 300 कोटी रुपयांवरील स्टँप ड्यूटी 48 तासांत माफ होते. तुम्हाला का सर्व फुकट लागते, असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी अजित पवारांवर आरोप केले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग एलएलपी कंपनीला तब्बल 1804 कोटी रुपयांचा बाजारभाव असलेली जमीन फक्त 500 रुपयांच्या बाँड पेपरवर अवघ्या 300 कोटी रुपयांमध्ये विकत घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे.पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरातील सरकारी मालकीची 40 एकर जमिनीच्या खरेदी व्यवहारामध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे. या जमिनीचा भाव कागदावर 300 कोटी रुपये इतका आहे. ही सरकारी किंमत असून खरी किंमत त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक असल्याचे दानवे म्हणाले. ही जमीन अमेडिया कंपनीने खरेदी केली आहे. अमेडिया कंपनीचे मालक उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोठा मुलगा पार्थ पवार आणि त्यांचे मामेभाऊ दिग्विजय अमरसिंह पाटील आहेत.
http://youtube.com/post/UgkxDoE-UsiHOnzJrLRKL6weAqu4rdbA4-Ku?si=dZmCpIjU_LEEYQT9
अंबादास दानवे म्हणाले की, पुण्यात नेमकं काय सुरु आहे. राज्यात देवाभाऊचे सरकार आहे की ते मेवाभाऊ आहेत? असा सवाल त्यांनी केला. पार्थ पवार यांच्या कंपनीला जमीन देण्यासाठी दोन दिवसांत फाईल पुण्यातून मुंबईत येते आणि उद्योग विभागाकडून त्याला मंजुरी दिली जाते. 1800 कोटींची जमीन 300 कोटींमध्ये फक्त स्टँप पेपरवर खरेदी केली जाते. एवढ्या वेगाने जर काम होत असेल तर हे सामान्य माणसासाठी का होत नाही?
दानवे म्हणाले की, महाराष्ट्रात फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाची जमीन घशात घालायची हा अजित पवारांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे का? असाही सवाल त्यांनी एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवरील पोस्टमधून केला.
Why do you want everything for free? Ambadas Danve questions Ajit Pawar on Koregaon Park land deal
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी


















