विशेष प्रतिनिधी
मुंबई : मतदार यादीच्या घोळाच्या संदर्भात आणि मतचोरीच्या संदर्भात एकत्रित येत सत्याचा मोर्चा काढता आणि मग निवडणूक का वेगळी लढवता? असा सवाल राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काॅंग्रेसच्या नेत्यांना केला. Sharad Pawar
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. यावेळी महाविकास आघाडीबाबत चर्चा झाली. परप्रांतिय मतांवर परिणाम व्हायला नकाे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला साेबत घेऊ नये अशी भूमिका काॅंग्रेसने मांडली आहे.
स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारीही केली आहे. या पार्श्वभूमीर काॅंग्रेस नेते शरद पवार यांना भेटले. मात्र, शरद पवारांनी त्यांना चांगलेच सुनावले. महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेऊन निवडणूक लढवण्याच्या संदर्भात शरद पवार सकारात्मक असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.
दोन महिन्यांपूर्वी आम्ही महाविकास आघाडी म्हणून नाही तर स्वबळावर निवडणुका लढवणार आहोत, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं होतं. ही निवडणूक स्थानिक पातळीवरची असल्याने आम्ही एकट्याने लढू शकतो, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. बाकी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर आम्ही शुभेच्छाच देतो. पण हा निर्णय घेताना आमच्याशी चर्चा व्हायला हवी होती. काँग्रेस पक्ष हा आघाडी करताना एक किमान समान कार्यक्रम समोर ठेवून आघाडी करतो. इंडिया आघाडी असो किंवा महाविकास आघाडी असो, आमच्यासाठी संविधान हा समान धागा राहिलेला आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
महायुती विरोधात मुंबई महापालिका निवडणूक जिंकायची असेल तर विरोधकांची वज्रमूठ आणखी घट्ट करून ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे हे प्रयत्नशील असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडीने एकत्र लढवावी अशी शरद पवारांची भूमिका आहे.
Why hold a united truth march yet contest elections separately, Sharad Pawar questions Congress
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : प्रो बैलगाडा लीग सुरू करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घाेषणा
- Sharad Pawar : काॅंग्रेसला ठाकऱ्यांचा नकाे हात, शरद पवारांची घेणार साथ
- संविधानिक संस्थांवर काँग्रेसच्या हल्ल्यांचा निषेध, २७२ माजी अधिकारी व न्यायमूर्तींचे खुले पत्र
- सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयावर महापालिका – जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य, नाेटिफिकेशन काढण्यासाठी थांबण्याचे न्यायालयाचे निर्देश



















