विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राचे मतदार असल्याने राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदासाठी पाहे. पाठिंबा देण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना केली हाेती. मात्र, शरद पवार यांनी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यास विराेध केला आहे. त्यामागचे कारणही त्यांनी सांगितले आहे.
पत्रकारांशी बाेलताना शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन कॉल आला होता. उपराष्ट्रपतिपदासाठी त्यांच्या पक्षाचे जे उमेदवार आहेत, ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याची विनंती त्यांनी माझ्याकडे केली. मात्र राधाकृष्णन राज्यपाल असताना झारखंडच्या सीएम यांना त्यांच्या राजभवनात अटक झाली होती. त्यामुळे त्यांना पाठिंबा देणे आमच्यासाठी शक्य नसल्याचे मी त्यांना सांगितले आहे.
शरद पवार यांनी सांगितले की, आमच्याकडे मतदार कमी आहेत, हे आम्हाला माहिती आहे. मात्र, आम्हाला निकालाची चिंता नाही. उपराष्ट्रपती निवडणुकीत आमच्याकडे लोकसभा आणि राज्यसभा मिळून मतदार ठरलेले आहेत. आमचा उमेदवार विजयी होईल, एवढी संख्या आमच्याकडे नाही. आमची ठरलेली मते आहेत. त्यामुळे बाकीचे उद्योग आम्ही करत बसणार नाही. मते कमी असली तरी आम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला अ आहे. आमचे मतदार किती आहेत, हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे या निवडणुकीत काही वेगळा निकाल लागेल, अशी अपेक्षाच नाही.
शरद पवार म्हणाले, बिहारमध्ये राहुल गांधी यांचा दौरा चालू आहे. त्या ठिकाणाहून मिळत असलेल्या फीडबॅक नुसार त्यांच्या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. बिहार हे राज्य आर्थिक दृष्ट्या अडचणीचे राज्य आहे. हे आपण नेहमी ऐकतो. असे असले तरी राजकीय दृष्ट्या बिहार हे अत्यंत जागृत राज्य असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. बिहारमध्ये मत चोरी संदर्भात या यात्रेच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आम्ही आगामी काळात हा कार्यक्रम देशभरात राबवला जाईल. मतदार यादी बाबत आमचा अभ्यास सुरू आहे. मात्र निवडणूक आयोग स्पष्ट माहिती द्यायला तयार नाही, असा आरोप देखील शरद पवार यांनी केला आहे. यासंदर्भात पहिल्यांदाच 300 खासदार हे रस्त्यावर उतरले होते. त्या ठिकाणी आम्हाला अटक देखील झाली होती, अशी माहिती देखील शरद पवार यांना दिली आहे. मतदार यादीमधील घोळाबाबत आमचा अभ्यास सुरु आहे.
…That’s why Sharad Pawar refuses to support Radhakrishnan for the Vice Presidential post.
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला