विशेष प्रतिनिधी
मुंबई : GDP एप्रिल-जून 2025 तिमाहीत भारताचा सकल देशांतर्गत उत्पन्नाचा (GDP) दर तब्बल 7.8 टक्क्यांवर पोहोचला आहे. मागील पाच तिमाहीतील हा सर्वाधिक आकडा ठरला असून, सेवाक्षेत्रातील जोरदार वाढ यामागचे प्रमुख कारण ठरले आहे. सांख्यिकी मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, हा दर जानेवारी-मार्च 2025 मधील 7.4 टक्क्यांपेक्षा जास्त असून, 2024-25 च्या पहिल्या तिमाहीतील 6.5 टक्क्यांपेक्षा खूपच वर आहे.GDP
या वाढीमुळे भारताने पुन्हा एकदा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेचा दर्जा कायम राखला आहे. अमेरिकेने भारतीय मालावर 50 टक्के टॅरिफ लावल्याने जागतिक अर्थव्यवस्था डळमळली असताना भारताचा हा वाढीचा वेग धोरणकर्त्यांसाठी मोठा दिलासा ठरला आहे. 27 ऑगस्टपासून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या भारतीय वस्तूंवर हा वाढीव कर लागू झाला असून, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय भारताकडून रशियन शस्त्रे आणि तेल खरेदी सुरू असल्यामुळे घेतल्याचे सांगितले होते.GDP
यापूर्वी 6 ऑगस्ट रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एप्रिल-जून तिमाहीतील जीडीपी वाढ केवळ 6.5 टक्के असेल, असा अंदाज वर्तविला होता. बहुतांश अर्थतज्ज्ञांनीही जानेवारी-मार्चमधील 7.4 टक्क्यांपेक्षा कमी वाढ होईल असे गृहित धरले होते, परंतु प्रत्यक्षात वाढ अपेक्षेपेक्षा जास्त नोंदवली गेली.
मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंथा नागेश्वरन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अमेरिकन टॅरिफमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेनंतरही सरकार चालू आर्थिक वर्षात 6.3 ते 6.8 टक्के वाढीचा अंदाज कायम ठेवत आहे.
भारताची ही दमदार सुरुवात केवळ जागतिक व्यापारयुद्धाच्या सावटातच नाही तर आगामी धोरणात्मक निर्णयांसाठीही सरकारला बळ देणारी ठरू शकते.
Why worry about tariffs? India’s GDP surges with strong momentum
महत्वाच्या बातम्या
- किती माजलाय तो जरांग्या, भाषा मग्रुरीची : गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबाेल
- मंत्र्याला काढण्याची घटनेतच तरतूद तर घटना दुरुस्ती कशासाठी, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
- न्यायदेवता अन्याय करणार नाही, मुंबईत जाणारच : मनाेज जरांगेंचा निर्धार
- एकेरी भाषा, आयाबहिणींवर अपशब्द खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनाेज जरांगेंना इशारा