विशेष प्रतिनिधी
मुंबई : सरकार उलथवून टाकण्याची भाषा करणे, एकेरी भाषेत बोलणे, आमच्या आयाबहिणींवर अपशब्द वापरणे हे कुणीही खपवून घेणार नाही, असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा आंदाेलक मनाेज जरांगे यांना दिला आहे. Chandrashekhar Bawankule
मनाेज जरांगे यांनी २९ ऑगस्टपासून मुंबईत आंदाेलनाचा इशारा दिला आहे. या निमित्ताने सभांमध्ये बाेलताना जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईविषयी अपशब्द वापरले. यामुळे महायुती सरकारने मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याविरोधात आता अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले. पण त्यांच्याच परिवारावर एकेरी भाषेत टीका करता. सरकार उलथावून टाकण्याची भाषा करता. आमचे सरकार लुळेपांगळे नाही. अरेरावीची भाषा बंद करा, असा इशारा सरकारने जरांगे यांना दिला आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या प्रकरणी आपला संताप व्यकत करताना म्हणाले, मनोज जरांगे पाटील सरकार उलथवून टाकण्याची भाषा करत आहेत. हे पूर्णतः अयोग्य आहे. कारण, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार अतिशय मजबूत आहे. हे सरकार जनतेने 3 कोटी 17 लाख मतांनी निवडून दिले आहे. 51.78 टक्के मते घेऊन हे सरकार आले आहे. त्यानंतरही हे सरकार उलथावून टाकू अशी भाषा करणे हे महाराष्ट्राला चीड आणणारे आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की, कुणीही चिथावणीखोर भाषा करू नये. कुणीही कुणाला चिथावणी देऊ नये.
मराठा आरक्षण या राज्यात आणण्याचेच काम देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यांनी स्वतः मराठा समाजाचे आर्थिक, सामाजिक सर्वेक्षण करण्याचे काम केले आहे. 2014 ते 2019 या काळात फडणवीसांनी स्वतः 7-8 रात्री जागरण करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा तयार केला होता. तो विधिमंडळात, हायकोर्टात टिकला. सुप्रीम कोर्टातही टिकला. पण उद्धव ठाकरे सरकार आल्यानंतर हा कायदा सुप्रीम कोर्टाने निरस्त केला, अशी टीका करत बावनकुळे म्हणाले, ज्यांनी मराठा समाजासाठी आपली संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली. मराठा आरक्षण दिले. अशा माणसाला एकेरी भाषेत बोलणे, त्याच्या परिवाराबद्दल, आमच्या आई-बहिणींबद्दल अशा पद्धतीने बोलणे महाराष्ट्रही सहन करणार नाही. ही भाषा बंद झाली पाहिजे. आंदोलन करायचे तर करा. मागण्या करायच्या तर करा. पण आमचे सरकार उलथवून टाकण्याची भाषा करणे, एकेरी भाषेत बोलणे खपवून घेणार नाही, असे बावनकुळे म्हणाले.
बावनकुळे म्हणाले, कालची भाषा अर्वाच्च्य होती. अशी भाषा या राज्यात करू नये अशी माझी महाराष्ट्रातील सर्वच आंदोलनकर्त्यांना विनंती आहे. हे सरकार लुळेपांगळे नाही. सरकार मजबूत आहे. हे प्रचंड ताकदवान सरकार आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार म्हणून या राज्यातील 14 कोटी जनतेसाठी आम्ही काम करत आहोत. असे सरकार उलथवून टाकतात. ही भाषा बंद झाली पाहिजे. आपल्या मागण्या केल्या पाहिजे. त्या मागण्या नियमात बसतील, त्यासाठी काही नियम होतील, बैठका होतील, चर्चा होतील. उपसमितीची बैठक होईल, त्यात काही निर्णय होईल. मराठा समाजाला जे काही द्यायचे असेल ते देवेंद्र फडणवीस सरकारने दिले आहे. यापुढेही आमचे सरकार काम करणार आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सरकारने त्यांचे सर्वच म्हणणे मान्य केले. सरकारने सर्वेक्षण केले. त्यात जे लोक कुणबी आढळले किंवा ज्यांच्या जुन्या नोंदी आढळल्या त्यांना ओबीसीत घेण्यात आले. पण या प्रकरणी ज्या पद्धतीने अरेरावीची भाषा सुरू आहे. महाराष्ट्राला कुणीही डाग लावण्याचा प्रयत्न करू नये. शेवटी तुमची मागणी सरकारकडे मागा. सरकारने त्यासाठी उपसमिती तयार केली आहे, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
Will Not Tolerate Abusive Language Against Women, Chandrashekhar Bawankule Warns Manoj Jarange
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला