विशेष प्रतिनिधी
जालना: पुन्हा एकदा सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, कर्जमाफी होणारच नाही. 30 जून पर्यंत शेतकरी मरेल ना? त्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांने जगायचे कसे? असा सवाल करत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. Manoj Jarange
राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी समिती नेमली असून 30 जून पर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. यावर टीका करताना जरांगे म्हणाले, शेतकऱ्यांची आजची परिस्थिती खूप खराब आहे.सरकारच्या आश्वासनावर शेतकरी जगू शकत नाही, कर्जमाफीचे आश्वासन देणं ही शेतकऱ्यांसह महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेची फसवणूक आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, तुमच्या शब्दावर शेतकऱ्यांचे पोट भरणार नाही. लोकांच्या घरात वह्या पुस्तक राहिले नाही त्यांचे जनावरे आणि पीक वाहून गेले आहे. सवाल जरांगे यांनी उपस्थित केला आहे. याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील. अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करणार असे सरकारने जाहीर केले होते. पण शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा जमा झाला नाही. आता काही जणांच्या खात्यामध्ये 3 हजार पडत आहे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? लाख दोन लाखांचे नुकसान झाले त्यांना 5 ते 7 हजार रुपये देत आहेत त्यांना खराब सडलेले पीक काढण्यासाठीच 10 हजार रुपये लागणार आहे. तुम्ही जर शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणार असताल तर याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागेल. शेतकरी आंदोलन करतो म्हणून जर त्यांच्यावर गुन्हा दाखल होत असेल तर हे मुगलांपेक्षाही पुढे गेले म्हणावे लागेल.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आंदोलनासाठी जे मराठा बांधव मुंबईत गेले होते त्यांना आता नोटीस येत आहेत. तुमचा कायदा इतका सक्रिय आहे तर तेव्हाच गुन्हे दाखल करायला हवे होते. आता सुडबुद्धीने वागायचे आम्ही म्हणतो ते ऐकले नाही तर तुमच्या मागे चौकशी लावू, तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू. आमच्या बाजूने राहिले तर बाहेर राहताल जर विरोधात गेले तर कारागृहात जावे लागेल अशी सत्ताधारी पक्षाची वागणूक आहे. यापूर्वी असे नव्हते. विरोध केला म्हणून ते मान्य केले जात होते पण जेरीस आणले जात नव्हते. आता मोगलाई पेक्षा जास्त अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे. नागपूरमध्ये एखादा रस्ता अडवला म्हणून काही महाराष्ट्राचे खूप मोठे नुकसान झाले असे होत नाही. आपला आवाज सरकारपर्यंत जावा म्हणून शेतकऱ्यांनी ते पाऊल उचलले होते. त्या रस्ता रोकोमुळे काय कुणी केले का? राजकीय नेत्यांसाठी अनेकदा रस्ता अडवला जातो तेव्हा त्यांच्यावर कारवाई होत नाही, असेही जरांगेंनी म्हटले आहे. शेतकऱ्यांनी आपला लढा लढला पाहिजे, कोणावरही विश्वास ठेवू नये.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारच्या समित्यांवर आमचा विश्वास नाही, ते बंद करा.तुम्हाला सांगितले ना सरसकट कर्जमुक्ती करा त्यात काय भेदभाव करायचा. त्यांचे म्हणणे आहे की काही मोठे घराणे 200 असतील पण त्यांच्यासाठी इतर शेतकऱ्यांचे वाटोळं करता का? सरकारने नेमलेली समिती बरखास्त करा. अन्यथा शेतकऱ्यांनी यांना महाराष्ट्रात फिरू देऊ नये. शेतकऱ्यांनी स्वत:च लढा स्वत:च लढला पाहिजे. कुणावरही विश्वास ठेवता कामा नये. शेतकऱ्यांनी यांच्या सभेला, प्रचाराला जाऊ नये. शेतकऱ्यांना मारून टाकण्याचे हत्यार म्हणजे समिती आहे.
Will the farmer die by June 30? Manoj Jarange demands immediate help, no committee
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा
 
				 
													


















