Sanjay Shirsat : विट्स हॉटेलच्या लिलावातून माघार; विरोधकांवर संताप व्यक्त करत मंत्री संजय शिरसाट यांचे स्पष्टीकरण

Sanjay Shirsat : विट्स हॉटेलच्या लिलावातून माघार; विरोधकांवर संताप व्यक्त करत मंत्री संजय शिरसाट यांचे स्पष्टीकरण

Sanjay Shirsat

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथील विट्स हॉटेलच्या लिलावात आपला मुलगा सहभागी झाला असला तरी आता या प्रकरणातून संपूर्णपणे माघार घेत असल्याचे समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी स्पष्ट केले आहे. या व्यवहारावरून विरोधकांकडून करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर त्यांनी पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिले.



“उद्या माझ्या मुलाला मी पत्र देऊन लिलावाच्या प्रक्रियेपासून मागे हटण्यास सांगणार आहे. आता ज्यांना वाटत असेल की आम्ही ११० कोटींची बोली लावली, त्यांनी पुढे यावं. मी स्वतः पेढे घेऊन त्यांचे स्वागत करीन,” असे सांगून शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, मराठी माणसाचे नाव घेताना कुणालाही लाज वाटत नाही. उलट त्याच्या पायात अडथळे टाकले जातात. मनपातील दलाल मंडळीत एकही मराठी व्यक्ती नव्हती.

विट्स हॉटेलचा हा सातवा लिलाव होता, असे सांगत शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी याबाबतची संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर असल्याचे सांगितले. ते म्हणाले, डिपॉझिट भरल्यानंतर लिलावात सहभागी होता येते. त्यानंतर २५% रक्कम एका महिन्यात भरावी लागते आणि उर्वरित रक्कम बँकेच्या माध्यमातून तीन महिन्यांत. ही सगळी प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत पार पडली आहे.

विरोधकांवर संताप व्यक्त करताना शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, तुम्ही माझ्या व्यवसायावर लाथ मारलीत. माझं १०–१५ लाखांचं नुकसान झालं असेल. ठीक आहे, जाऊ द्या. पण हे जे पाप केलं आहे त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. जर वैयक्तिक आरोप सुरू झाले, तर माझ्याकडेही सगळ्या स्टोरीज आहेत. त्यादिवशी मी त्या उघड केल्या तर घराला आग लावायची कमी करणार नाही. राजकारणापुरते आरोप करा, मी उत्तर देईन. पण मुलांवर, कुटुंबावर बोलाल, तर परिणाम तुम्हालाही भोगावे लागतील.”

Withdrawal from Wits Hotel auction; Minister Sanjay Shirsat’s explanation, expressing anger at the opposition

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023