विशेष प्रतिनिधी
अकोला : नेपाळमध्ये ‘जेन-झी’ आंदोलनादरम्यान जनता रस्त्यावर उतरली होती आणि सरकारला हादरे बसले होते. आपल्या शेतकऱ्यांनाही न्याय हवा असेल, तर दोन-चार मंत्र्यांना तुडवल्याशिवाय ही व्यवस्था कधीच जागी होणार नाही, असे वादग्रस्त विधान शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केले आहे.
अकोल्यातील शेतकरी संवाद सभेत बोलताना शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी आक्रमक पावलं उचलावी लागतील, असे सांगताना तुपकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेतली जात नाही. त्यामुळे आता वेगळे मार्ग अवलंबणे गरजेचे होणार आहे.
बच्चू कडू यांनीही तुपकर यांच्या बोलण्याची री ओढत म्हणाले, जळगावातील आंदोलनात आम्ही फक्त जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट तोडलं. यानंतर राज्यात होणाऱ्या आंदोलनात आम्ही आता थेट कलेक्टरलाच तोडू,
भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांना आवाहन करताना म्हटले की, आपली जमीन हीच खरी संपत्ती आहे. ती विकू नका, कारण जमीन विकली तर पुढील पिढीचे भविष्य अंधारात जाईल.
सभेदरम्यान, शेतकरी कर्जमाफी, पिकांना योग्य हमीभाव आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणीही करण्यात आली.
Without trampling two or four ministers… Ravikant Tupkar’s controversial statement
- महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!