विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Rekha Gupta मागील आम आदमी पक्षाच्या (AAP) सरकारने सार्वजनिक तिजोरी रिकामी सोडली आहे. मात्र, त्याचा परिणाम महिलांसाठी ₹2,500 मासिक मदत योजनेच्या अंमलबजावणीवर होणार नाही, असे दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले.Rekha Gupta
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भा महिला समृद्धी योजना’ अंतर्गत गरीब कुटुंबांतील महिलांना दरमहा ₹2,500 आणि गर्भवती महिलांसाठी ₹21,000 च्या आर्थिक मदतीची घोषणा केली होती.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या, मागील सरकारमुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, वित्तीय स्थितीचा आढावा घेताना तिजोरी संपूर्णपणे रिकामी असल्याचे दिसते. मात्र, ‘महिला समृद्धी योजना’ हा आमच्या भगिनींसाठी सातत्याने सुरू राहणारा उपक्रम असून, त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यात येईल.
दिल्ली विधानसभेचे पहिले अधिवेशन २४ फेब्रुवारीपासून सुरू होत असून, त्यात सर्व आमदार शपथ घेणार आहेत. तसेच, अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. याशिवाय, कार्यवाह अध्यक्षांची शपथ सोमवारी राज्यपालांच्या उपस्थितीत घेतली जाईल.
दरम्यान, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि आप नेत्या आतिशी यांनी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना २३ फेब्रुवारी रोजी पत्र लिहून आप विधिमंडळ गटाच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यांनी नमूद केले की, २० फेब्रुवारीला पहिली कॅबिनेट बैठक झाली असली तरीही ₹2,500 मासिक मदत योजनेस मान्यता मिळालेली नाही.
आतिशी यांनी म्हटले आहे की, दिल्लीतील महिलांनी मोदीजींच्या हमीवर विश्वास ठेवला, मात्र आता त्या फसवल्याची भावना व्यक्त करत आहेत.
You emptied the vault; Still wonen in Delhi will get Rs 2,500, says Chief Minister Rekha Gupta
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Nirupam : एसआरए प्रकल्पांमध्ये हिंदू कमी करून हाऊसिंग जिहाद, संजय निरुपम यांचा आरोप
- धक्कापुरुष कायमचा घरी बसविला , एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- Raj Thackeray मराठी भाषा गौरव दिनी मनसेचे पुस्तक प्रदर्शन, राज ठाकरेही आवडीची कविता सादर करणार
- Sharad Pawar शरद पवार यांनी सांगितलं आपल्या पंतप्रधानपदाचा किस्सा, नाव शॉर्टलिस्ट पण…