विशेष प्रतिनिधी
मुंबई : Jayant Patil सर्वोच्च न्यायालयाने आदेश देताना निवडणूक आयोगास आवश्यकता भासल्यास निवडणूक घेण्याबाबत मुदतवाढ घेण्याची मुभा दिलेली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने निवडणूक आयोगाच्या आडून निवडणुका घेण्यास चालढकल करू नये, अशीच आमची अपेक्षा आहे, अशी मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.Jayant Patil
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबतची अधिसूचना येत्या चार आठवड्यात काढावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यावरून जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
जयंत पाटील यांनी ट्वीट करताना म्हटले की, लोकशाही वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार. कारण गेली 3 वर्षे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोणत्याही निवडणुका संपन्न झाल्या नव्हत्या. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेली 3 वर्षे प्रशासकीय अधिकारी चालवत आहेत, ही बाब लक्षात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांची घोषणा एक महिन्याच्या आत करण्याचा आणि निवडणुका प्रक्रिया चार महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचा अंतरिम आदेश दिला आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
जयंत पाटील म्हणाले की, ओबीसी आरक्षणाबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधीन राहून या निवडणुका होतील. परंतु सध्या राज्यातील सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गरजेच्या आहेत. 3 वर्षांच्या विलंबाने का होईना, नवीन नेतृत्व तयार होण्यासाठी आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या या निवडणुका घेण्याचा आदेश दिल्याबद्दल मी आमच्या पक्षाच्या वतीने देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो, असे पाटील यांनी म्हटले.
Don’t rush to hold elections now, hopes Jayant Patil
महत्वाच्या बातम्या
- Operation sindoor वर मोदींचे मॉनिटरिंग; जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा, हिजबुल यांच्या म्होरक्यांना मारण्यासाठीच पाकिस्तानात 9 ठिकाणांवर भारताचे मिसाईल हल्ले!!
- Operation sindoor : पाकिस्तानात 3 ठिकाणी 9 टार्गेटवर भारताचा क्षेपणास्त्र हल्ला; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा घेतला बदला!!
- Devendra Fadnavis : अहिल्यादेवी यांचे जन्मगाव चौंडीचा तीर्थस्थळ म्हणून विकास करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
- Mahadev Jankar : भाजपने विचारले नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली, महादेव जानकारांची खंत