Indrayani River : इंद्रायणी नदी शुद्धीकरणासाठी ५२५ कोटींची कामे मंजूर; पवना नदीसाठीही उपाययोजना

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Indrayani River सर्वसामान्य नागरिकांसह वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या इंद्रायणी नदीच्या स्वच्छता आणि शुद्धीकरणासाठी अमृत योजनेअंतर्गत सुमारे ५२५ कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच इंद्रायणीसोबतच पवना नदीच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठीही व्यापक उपाययोजना राबविण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.Indrayani River

पिंपरी-चिंचवड परिसरातील मेट्रो प्रकल्प, नदी सुधारणा आणि पर्यटन विकास या विषयांवर भाजप आमदार उमा खापरे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोहे यांनी इंद्रायणी नदीतील वाढत्या प्रदूषणाकडे सरकारचे लक्ष वेधले.Indrayani River

नदी प्रदूषण रोखण्यासाठी पीएमआरडीएच्या माध्यमातून विविध सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारले जात आहेत. मात्र स्थानिकांकडून काही उद्योगांमध्ये प्रदूषित पाणी शुद्ध करण्याचे प्लांट पूर्ण क्षमतेने चालवले जात नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. काही ठिकाणी संध्याकाळी हे प्लांट बंद ठेवले जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगांनी प्रदूषित पाण्याचे योग्य शुद्धीकरण करूनच ते नदीत सोडावे, यासाठी शासनाने कडक अंमलबजावणी करावी, असे निर्देश डॉ. गोहे यांनी दिले.Indrayani River



अमृत योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या ५२५ कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी केंद्र सरकार २५ टक्के, राज्य सरकार २५ टक्के आणि महानगरपालिका ५० टक्के निधी देणार आहे. या निधीतून नदी स्वच्छता, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणी आणि प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित विविध कामे राबवली जाणार आहेत.

या प्रकल्पांमुळे इंद्रायणी नदीत जाणारे सांडपाणी थांबवणे, आधुनिक शुद्धीकरण प्रकल्प उभारणे आणि नदीतील प्रदूषण कमी करणे शक्य होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

वारकरी संप्रदायासाठी विशेष धार्मिक महत्त्व असलेल्या इंद्रायणी नदीची स्वच्छता राखण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जातील. तसेच पवना नदीच्या शुद्धीकरणासाठीही स्वतंत्र उपाययोजना राबवून स्थानिक लोकप्रतिनिधी, संबंधित विभाग आणि प्रशासन यांच्या समन्वयातून पुढील कार्यवाही केली जाईल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

₹525 Crore Project Approved to Clean Indrayani River in Maharashtra

महत्वाच्या बातम्या