Pushpak Express : पुष्पक एक्स्प्रेसमधून 12 प्रवासी ट्रॅकवर पडले, पाच जणांचा मृत्यू, दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान अपघात

Pushpak Express : पुष्पक एक्स्प्रेसमधून 12 प्रवासी ट्रॅकवर पडले, पाच जणांचा मृत्यू, दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान अपघात

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मध्य रेल्वेमार्गावर सोमवारी सकाळी एक मोठा अपघात झाला. पुष्पक एक्स्प्रेस कसाऱ्याच्या दिशेने जात असताना या गाडीतून 12 प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले. या प्रवाशांना तातडीने रुग्णावाहिका आणून कळव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र पाच प्रवाशांचा मृत्यू झाला.

मध्य रेल्वेच्या दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होते. त्यामुळे हे प्रवासी दारात लटकले होते..

ही दुर्घटना सकाळच्या गर्दीच्या वेळेस घडल्याने प्रचंड घबराट उडाली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून रेल्वेने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.



पुष्पक एक्स्प्रेस मुंबई ते लखनौदरम्यान धावते. सीएसएमटीवरुन सकाळी 8.25 वाजता पुष्पक एक्स्प्रेस निघाली होती. पुष्पक एक्स्प्रेसचा पुढचा थांबा कल्याण रेल्वे स्थानक होता. मात्र दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान आल्यावर हे प्रवासी रेल्वेतून पडले.

पाच प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ रेल्वेतून खाली पडले. कसाऱ्याला जाणाऱ्या रेल्वेच्या गार्डनं याबाबतची माहिती दिली. नेमक्या कोणत्या गाडीतून प्रवासी खाली पडले, याबाबत अद्याप माहिती नाही, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी दिली.

“ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर सीएसएमटीकडे जाणारे काही प्रवासी ट्रेनमधून पडले. ट्रेनमध्ये जास्त गर्दी असल्याने हा अपघात झाल्याचे मानले जात आहे. रेल्वे प्रशासन आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे. अपघाताची चौकशी सुरू झाली आहे. या घटनेमुळे स्थानिक सेवांवरही परिणाम झाला आहे,” अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

 

12 passengers from Pushpak Express fell on the tracks, five people died, accident between Diva and Kopar railway stations

महत्वाच्या बातम्या

 

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023